मोटरसायकलसह दोघे पुरात गेले वाहून

सासुरवाडीहून मध्यप्रदेशातील गावी जात असताना दोन तरुण मोटरसायकसह वाहून गेल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील कवलेवाडा-चिखला रस्त्यावरील नाल्यावर  रात्रीच्या वाजताच्या सुमारास घडली आहे. यापैकी एक जण बचावला तर दुसरा बेपत्ता आहे. गोबरवाही पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अंधारामुळे शोधकार्य थांबविण्यात येत आज पहाटे पासून शोधकार्य सुरु आहे. सारांश मुन्नालाल सुखदेवे वय २७ वर्ष रा. खैरलांजी […]

मोटरसायकलसह दोघे पुरात गेले वाहून

सासुरवाडीहून मध्यप्रदेशातील गावी जात असताना दोन तरुण मोटरसायकसह वाहून गेल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील कवलेवाडा-चिखला रस्त्यावरील नाल्यावर  रात्रीच्या वाजताच्या सुमारास घडली आहे. यापैकी एक जण बचावला तर दुसरा बेपत्ता आहे. गोबरवाही पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अंधारामुळे शोधकार्य थांबविण्यात येत आज पहाटे पासून शोधकार्य सुरु आहे. सारांश मुन्नालाल सुखदेवे वय २७ वर्ष रा. खैरलांजी जि. बालाघाट (मध्यप्रदेश) असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. तर रवी सेवक टेकाम ३१ वर्ष र रा. खैरलांजी जि. बालाघाट असे बचावलेल्या तरूणाचे नाव आहे.

दोघे तरूण रवीची सासुरवाडी असलेल्या तुमसर तालुक्यातील बाळपूर हमेशा येथे आले होते. रात्री चिखला मार्गे ते मध्यप्रदेशातील खैरलांजीकडे जात होते. रात्रीच्या सुमारास कवलेवाडा-चिखला रस्त्यावरील पुलावरून जात असताना अंधारामुळे पुलावरून पाणी असल्याचे त्यांना दिसले नाही, त्यामुळे दोघेही मोटरसायकलसह पुलावरून पाण्यात पडले. यापैकी रवी टकाम काही वेळात सुखरूप बाहेर आला. सारांश सुखदेवे पाण्यात वाहून गेला. रवीने या घटनेची माहिती सासुरवाडीला दिली. त्यांनी ही माहिती तात्काळ गोबरवाही पोलिसांना दिली. पोलीस पथक काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले असून वाहून गेलेल्या तरूणाचा शोध सुरू केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number