पेपरफुटीत आणखी दोघे अटकेत

बुलढाणा पेपरफूटी प्रकरणी आणखी दोन जण जाळ्यात अडकले आहेत. या प्रकरणातील आरोपींची संख्या सात वर गेली आहे. बुलढाणा येथे १२ वीचा गणिताचा पेपर फूटी प्रकरणी आता पर्यंत ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता पुन्हा पोलिसांच्या हाती दोन आरोपी लागले असून या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या ही ७ झाली आहे. शकील शे. […]

पेपरफुटीत आणखी दोघे अटकेत

बुलढाणा पेपरफूटी प्रकरणी आणखी दोन जण जाळ्यात अडकले आहेत. या प्रकरणातील आरोपींची संख्या सात वर गेली आहे. बुलढाणा येथे १२ वीचा गणिताचा पेपर फूटी प्रकरणी आता पर्यंत ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता पुन्हा पोलिसांच्या हाती दोन आरोपी लागले असून या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या ही ७ झाली आहे.

शकील शे. मुनाफ आणि अंकुश पृथ्वीराज चव्हाण अशी ताब्यात घेतलेल्या दोन शिक्षकांची नावं आहेत. बोर्डाच्या १२ वीच्या परीक्षा सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी गणिताचा पेपर झाला. मात्र, बुलढाणा येथे सिंधखेड तालुक्यातील एका खाजगी शाळेत गणिताचा पेपेर फुटला होता. गणिताच्या पेपरची दोन पाने ही व्हॉटसअपवर व्हायरल झाली होती. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. दरम्यान, या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. या पेपरफूटी प्रकरणी शिक्षक असल्याचे पुढे आले असून आता पर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

तसेच, अजून आरोपी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या पेपर फुटीचा संबंध हा थेट मुंबईतील विद्यार्थ्यांशीही असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number