Mumbai Metro Line 8: दोन विमानतळं आता मेट्रोने जोडणार! मुंबई मेट्रो ‘लाईन 8’ ला राज्य सरकारची अधिकृत मंजुरी; असा असेल प्रकल्प

राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी 'मुंबई मेट्रो लाईन 8' प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला आहे. सुमारे 22,862.07 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून (PPP) साकारला जाणार आहे.

Mumbai Metro Line 8: दोन विमानतळं आता मेट्रोने जोडणार! मुंबई मेट्रो ‘लाईन 8’ ला राज्य सरकारची अधिकृत मंजुरी; असा असेल प्रकल्प

Mumbai Metro Line 8: मुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही आंतरराष्ट्रीय विमानतळांदरम्यानचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुखकर होणार आहे. राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी 'मुंबई मेट्रो लाईन 8' प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला असून, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मार्गिकेच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्रकल्पाचे स्वरूप आणि गुंतवणूक
सुमारे 22,862.07 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून (PPP) साकारला जाणार आहे. या खर्चातील 40 टक्के वाटा सरकार उचलणार असून, 'सिडको'च्या (CIDCO) सहकार्याने 'डिझाइन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर' (DBFOT) या तत्त्वावर याची अंमलबजावणी केली जाईल.

कसा असेल मेट्रोचा मार्ग?
एकूण लांबी: 34.9 किलोमीटर.
स्थानकांची संख्या: या मार्गावर एकूण 20 स्थानके असतील.
रचना: यातील 25.09 किमी मार्ग उन्नत (Elevated) असून 9.8 किमी मार्ग भूमिगत (Underground) असेल. यात 14 उन्नत तर 6 भूमिगत स्थानकांचा समावेश आहे.
फायदा: सायन-पनवेल हायवे आणि अटल सेतूवरील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होईल.

कधी धावणार पहिली मेट्रो?
सरकारने जून 2026 पासून या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मंडाळे येथील 27.2 हेक्टर वनजमिनीवर या मेट्रोसाठी अद्ययावत कार डेपो उभारला जाणार आहे. सर्व काही नियोजित वेळेत पार पडल्यास 2031 पर्यंत ही मेट्रो मार्गिका प्रवाशांच्या सेवेत रुजू होईल.

हेही वाचा – Cab Women Safety : कॅबमधील महिलांच्या सुरक्षेसाठी असणारे SOS Button खरंच काम करते का? समोर आला धक्कादायक व्हिडीओ

प्रवासभाडे आणि वेळापत्रक
वारंवारता: सुरुवातीला दर 5.32 मिनिटांनी मेट्रो धावेल, जी भविष्यात 3 मिनिटांपर्यंत कमी केली जाईल.
भाडे: पहिल्या 3 किमीसाठी किमान 15 रुपये भाडे असेल, तर 42 किमीपेक्षा जास्त प्रवासासाठी कमाल 125 रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे.
प्रवासी क्षमता: पहिल्या टप्प्यात साधारण 9.82 लाख प्रवासी या सुविधेचा लाभ घेतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number