तुर्कीस्तान- भूकंपामुळे जनजीवन विस्कळीत

तुर्की आणि सीरियामध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपामुळे झालेल्या विध्वंसानंतर येथील परिस्थिती फार बिकट झाली आहे. बचाव पथकाने शुक्रवारी हताय प्रांतातून एका कुटुंबाला ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढलं आहे. या कुटुंबाने जीवनासमोर मृत्यूला हरवलं आहे. भूकंपानंतर सुमारे १०० हून अधिक तास उलटून गेले आहेत. तुर्की प्रशासन आणि भारतीय एनडीआरफ टीमकडून अनेक भागांमध्ये अद्यापही मदत आणि बचावकार्य सुरु आहे. […]

तुर्कीस्तान- भूकंपामुळे जनजीवन विस्कळीत

तुर्की आणि सीरियामध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपामुळे झालेल्या विध्वंसानंतर येथील परिस्थिती फार बिकट झाली आहे. बचाव पथकाने शुक्रवारी हताय प्रांतातून एका कुटुंबाला ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढलं आहे. या कुटुंबाने जीवनासमोर मृत्यूला हरवलं आहे. भूकंपानंतर सुमारे १०० हून अधिक तास उलटून गेले आहेत. तुर्की प्रशासन आणि भारतीय एनडीआरफ टीमकडून अनेक भागांमध्ये अद्यापही मदत आणि बचावकार्य सुरु आहे. भूकंपातील मृतांचा आकडा २३ हजारांच्या पुढे गेला आहे. अद्यापही अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत. १०८ तास ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका महिलेची आणि तिच्या तीन मुलांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. भूकंपामुळे हे चौघे जण ढिगाऱ्याखाली अडकले गेले होते, मात्र त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं आहे.महिला आणि तिच्या तिन्ही मुलांवर सध्या उपचार सुरु आहेत.

एनडीआरफ ची पथकं ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढताना दिसत आहेत. तुर्कस्तानमधील हताया येथे भारतीय लष्कराच्या फील्ड हॉस्पिटलमध्ये भूकंपामुळे प्रभावित झालेल्या लोकांना वैद्यकीय उपचार दिले जात आहेत. तुर्कीमध्ये आलेल्या भूकंपामुळे तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. ढिगाऱ्याखाली अद्यापही अनेक लोक अडकले आहेत.

तुर्की आणि सीरियामध्ये विनाशकारी भूकंप झाला आहे. भूकंपामुळे आतापर्यंत सुमारे २३ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. हा गेल्या काही दशकातील सर्वात मोठा भूकंप आहे. प्रशासन मदत आणि बचावकार्यामध्ये गुंतलं आहे. अनेक भागांत अद्याप मदतीचं साहित्य पोहोचलेलं नाही. भारताने संकटात सापडलेल्या तुर्कीला मदतीचा हात दिला आहे. ‘ऑपरेशन दोस्त’द्वारे भारत भूकंपग्रस्त भागात मदत पोहोचवत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number