Donald Trump: 165 वर्षानंतर मोठा बदल! अमेरिकन डॉलरवर आता डोनाल्ड ट्रम्प यांची सही?

165 वर्षांची परंपरा मोडणारा हा निर्णय आर्थिक आणि प्रतीकात्मकदृष्ट्या महत्त्वाचा ठरू शकतो.

Donald Trump:  165 वर्षानंतर मोठा बदल! अमेरिकन डॉलरवर आता डोनाल्ड ट्रम्प यांची सही?

अमेरिकेच्या इतिहासात अभूतपूर्व असा एक निर्णय समोर येत असून, डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंधित हा निर्णय सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. तब्बल 165 वर्षांची परंपरा मोडीत काढत अमेरिकन डॉलरच्या नोटांवर विद्यमान राष्ट्राध्यक्षांची स्वाक्षरी दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या 250व्या वर्षानिमित्त हा महत्त्वपूर्ण बदल करण्याची तयारी सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.

1861 पासून अमेरिकन चलनावर ‘ट्रेजरर ऑफ द युनायटेड स्टेट्स’ यांची स्वाक्षरी असण्याची परंपरा कायम होती. मात्र आता या परंपरेत बदल करून डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वाक्षरीचा समावेश करण्याचा विचार सुरू आहे. हा निर्णय प्रत्यक्षात आला तर अमेरिकेच्या आर्थिक आणि प्रशासकीय व्यवस्थेत एक मोठा ऐतिहासिक टप्पा गाठला जाईल.

अमेरिकेच्या युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ द ट्रेझरी कडून हा निर्णय स्वातंत्र्याच्या 250व्या वर्षाच्या उत्सवाशी जोडण्यात आला आहे. यासंदर्भात अमेरिकन ट्रेजरर ब्रँडन बीच यांनी सोशल मीडियावर माहिती देताना सांगितले की, हा निर्णय राष्ट्राध्यक्षांच्या नेतृत्वाची आणि देशासाठीच्या योगदानाची नोंद घेणारा ठरेल. त्यांच्या मते, हा बदल अमेरिकेच्या गौरवशाली इतिहासात नवे पान लिहिणारा ठरणार आहे.

हेही वाचा: 1 एप्रिलपासून आयकर नियमांत मोठी उलथापालथ! मील कार्ड, पॅन ते आयटीआरमध्ये होणार मोठे बदल

याच पार्श्वभूमीवर अमेरिकन सरकारने डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रतिमेसह 24 कॅरेट सोन्याच्या स्मारक नाण्याच्या डिझाइनलाही मंजुरी दिली आहे. हा निर्णय केवळ आर्थिकदृष्ट्याच नव्हे, तर प्रतीकात्मकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे ट्रंप यांच्या कार्यकाळातील धोरणे आणि प्रभाव अधोरेखित करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसते.

दरम्यान, अमेरिकेचे वित्तमंत्री स्कॉट बेसेंट यांनीही या निर्णयाचे समर्थन केले आहे. त्यांनी सांगितले की, ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली देश आर्थिक स्थैर्य, प्रगती आणि डॉलरच्या जागतिक वर्चस्वाच्या दिशेने पुढे जात आहे. त्यांच्या मते, चलनावर राष्ट्राध्यक्षांची स्वाक्षरी असणे हा त्या योगदानाचा सन्मान करण्याचा प्रभावी मार्ग आहे.

सध्या हा निर्णय अधिकृतपणे लागू होण्याची प्रतीक्षा असली तरी, तो अमलात आल्यास अमेरिकेच्या चलनव्यवस्थेत मोठा बदल घडेल, यात शंका नाही. परंपरा आणि आधुनिक राजकीय प्रतिमा यांचा संगम घडवणारा हा निर्णय भविष्यातील आर्थिक आणि राजकीय चर्चांना नवी दिशा देणारा ठरू शकतो.  

हेही वाचा: LPG and Fuel Crisis Update : फक्त काही दिवसांचाच साठा शिल्लक? सरकारचं आलं उत्तर, जारी केलं परिपत्रक

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number