आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात मविआच्या जाहिरातबाजीसाठी झाडांची कत्तल, मनसेचा गंभीर आरोप

राजेश शिंदे , मुंबई महाविकास आघाडी सरकारच्या जाहिरातबाजीसाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंच्याच मतदारसंघात झाडांची कत्तल झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. या धक्कादायक प्रकारामुळं मुंबईकरांमध्ये प्रचंड संताप आहे. वरळी सी-फेस समोरील मुंबई महापालिकेच्या शाळेजवळ, न्यायाधिशांच वास्तव्य असलेल्या ‘कावेरी सहकारी सोसायटी’च्या आवारातील झाडं कापण्यात आल्याचा आरोप मनसेनं केला आहे. तसंच परिसरातील अनेक झाडंही विषारी इंजेक्शन देऊन मारली असल्याचा दावाही […]

आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात मविआच्या जाहिरातबाजीसाठी झाडांची कत्तल, मनसेचा गंभीर आरोप

राजेश शिंदे , मुंबई

महाविकास आघाडी सरकारच्या जाहिरातबाजीसाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंच्याच मतदारसंघात झाडांची कत्तल झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. या धक्कादायक प्रकारामुळं मुंबईकरांमध्ये प्रचंड संताप आहे.

वरळी सी-फेस समोरील मुंबई महापालिकेच्या शाळेजवळ, न्यायाधिशांच वास्तव्य असलेल्या ‘कावेरी सहकारी सोसायटी’च्या आवारातील झाडं कापण्यात आल्याचा आरोप मनसेनं केला आहे. तसंच परिसरातील अनेक झाडंही विषारी इंजेक्शन देऊन मारली असल्याचा दावाही मनसेनं केला आहे. वरळी सी फेस समोरील झाडांच्या कत्तलींप्रमाणेच वरळीतीलच डॉ. अनि बेझंट रोडवर देखील जाहिरातीच्या होर्डिंगसाठी झाडांना विषारी इन्जेक्शन देऊन जाळल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे.

याबाबत मनसेनं मुंबई महापालिका आयुक्त आणि उद्यान अधीक्षकांना तक्रारीचं पत्र देखील दिलं आहे. जाहिरातीच्या होर्डिंगला अडथळा निर्माण होतो म्हणून अवैधरित्या झाडं कापल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. या होर्डि्गचं कंत्राट मिळालेली कंपनी ‘डी झेड ग्रुप’चे डायरेक्टर फैजल राशीद यांना झाडांच्या कत्तली बाबत जय महाराष्ट्र चॅनलने विचारणा करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी ‘जय महाराष्ट्र’ चा कॅमेरा पाहून पळ काढला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number