शॉक सर्किटमुळे हार्बरवरील वाहतूक सेवा विस्कळित

मुंबई म्हणजे घड्याळाच्या काट्यावर धावत रेल्वे प्रवास करणाऱ्यांची नगरी. आणि त्यातच जर मिनिटाभराचा विलंब होऊन एक रेल्वे चुकली तरी दिवसाचं सगळं गणित चुकून जातं. दरम्यान, बुधवारी (दि.७ जून) सकाळी सीएसएमटीकडे जाणाऱ्या रुळावर शॉक सर्किट झाले आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक सेवा विस्कळित झाली आहे. सीएसटी कडे जाणाऱ्या रुळावर शॉक सर्किट झाल्याने हार्बरवरील वाहतूक सेवा विस्कळित […]

शॉक सर्किटमुळे हार्बरवरील वाहतूक सेवा विस्कळित

मुंबई म्हणजे घड्याळाच्या काट्यावर धावत रेल्वे प्रवास करणाऱ्यांची नगरी. आणि त्यातच जर मिनिटाभराचा विलंब होऊन एक रेल्वे चुकली तरी दिवसाचं सगळं गणित चुकून जातं. दरम्यान, बुधवारी (दि.७ जून) सकाळी सीएसएमटीकडे जाणाऱ्या रुळावर शॉक सर्किट झाले आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक सेवा विस्कळित झाली आहे.

सीएसटी कडे जाणाऱ्या रुळावर शॉक सर्किट झाल्याने हार्बरवरील वाहतूक सेवा विस्कळित झाली आहे. त्यामुळे चाकरमान्यांचा मोठा गोंधळ उडाला आहे.
जुईनगर आणि नेरूळ स्थानकांच्या दरम्यान सीएसटी कडे जाणाऱ्या रुळावर शॉक सर्किट सारखा प्रकार घडला आहे, आणि त्यातून काही वेळासाठी मोठी आग लागली. त्यामुळे हार्बर वरील वाहतूक सेवा विस्कळित झाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सर्व गाड्या नेरूळ मध्येच ठप्प आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितनुसार, ओव्हर हेड वायर तुटली असल्याचे सांगण्यात येत आहे. पण अद्याप नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही.

सीएसएमटी लेनची वायर आणि खरकोपर लेनची वायर यामध्ये नेमकी कोणती वायर तुटली आहे हे अजून कळलेले नाही. जर सीएसएमटी लेनची वायर तुटली असेल तर काही तास गाड्या फक्त सीएसएमटी ते वाशी या दरम्यानच धावतील आणि खारकोपरची वायर तुटली असेल तर ती लाईन बंद राहील असे सांगण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number