परिवहनमंत्री अनिल परब यांचा दापोलीतील रिसॉर्ट बेकायदेशीर

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दापोली येथे बांधलेले रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याची माहिती महाराष्ट्र शासनाने दिली आहे. अनिल परब यांनी रिसॉर्टसाठी घेतलेला बिगरशेती जागेचा परवाना फसवणुकीने घेण्यात आल्यामुळे हा परवाना रद्द करण्यात आला आहे. परबांचा परवाना रद्द केल्याचे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने लोकायुक्तांपुढे सादर केले. या प्रतिज्ञापत्रात रिसॉर्ट बेकायदेशीर तसेच जमिनीचा परवाना बेकायदेशीर असल्याचेही सांगितले आहे. […]

परिवहनमंत्री अनिल परब यांचा दापोलीतील रिसॉर्ट बेकायदेशीर

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दापोली येथे बांधलेले रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याची माहिती महाराष्ट्र शासनाने दिली आहे. अनिल परब यांनी रिसॉर्टसाठी घेतलेला बिगरशेती जागेचा परवाना फसवणुकीने घेण्यात आल्यामुळे हा परवाना रद्द करण्यात आला आहे. परबांचा परवाना रद्द केल्याचे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने लोकायुक्तांपुढे सादर केले. या प्रतिज्ञापत्रात रिसॉर्ट बेकायदेशीर तसेच जमिनीचा परवाना बेकायदेशीर असल्याचेही सांगितले आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी लोकायुक्तांपुढे तक्रार दाखल केली होती. किरीट सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीनंतर लोकायुक्त निवृत्त न्यायमूर्ती व्ही. एन. कानडे यांच्यासमोर या प्रकरणाची ऑनलाईन सुनावणी झाली. त्यावेळी अनिल परब यांचे दापोलीतील रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याची माहिती महसूल आणि वनखात्याचे प्रधान सचिव नितीन करीर यांनी लोकायुक्तांसमोर दिली. अनिल परब यांनी रिसॉर्टसाठी घेतलेला बिगरशेती जागेचा परवाना फसवणुकीने घेण्यात आला असल्याचे करीर यांनी सांगितले. त्यामुळे बेकायदेशीर रिसॉर्टचे बांधकाम आणि सीआरझेड नियमांचे उल्लंघन झाल्याचे करीर यांनी सांगितले.

अनिल परब यांनी दापोलीत बांधलेले रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याची माहिती महसूल खात्यांनी लोकायुक्तांसमोर दिल्यामुळे आता दापोलीतील रिसॉर्टप्रकरणी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या  अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number