त्र्यंबकेश्वर तालुक्यात पुनः हृदय पिळवून टाकणारी घटना घडली आहे. दिवसेंदिवस या परिसरात बिबट्याच्या दहशती खाली येथील नागरिकांना जगावं लागत असताना, ब्राम्हणवाडे येथील शेतावर राहणाऱ्या कुटुंबातील एक ३ वर्षाच्या मुलीचा बिबट्याने पळवून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ब्राम्हणवाडे येथील नवसू पांडू कोरडे यांची ३ वर्षाच्या मुलगी नयना हिला बिबट्याने घराच्या अंगणातून नेले असून, घरात समजल्यावर आजूबाजूला शोध घेण्यात आला, गावातील तसेच परिसरातील नागरिकांनी शोध घेतला असता अखेर शेतात मृत अवस्थेत सापडली आहे.
वानविभागाच्या अधिकाऱ्यांना कळवले असता, घटना स्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेऊन पुढील कार्यवाही करण्यात आली आहे. त्र्यंबक पोलीस स्टेशनंचे पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे सह त्यांचे कर्मचारी यांनी घटना स्थळी धाव घेऊन घटनेची सखोल माहिती घेण्यात आली, परिसरातून सदर घटनेची हळहळ व्यक्त केली जात असून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. सद्या तणावाचे वातावरण असून वानविभागाला येथील स्थानिक नागरिक यांनी धारेवर धरले आहे, मृतदेह नाशिक जिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदणासाठी हलवण्यात आले आहे.