आज भारतीय बाजारात सोन्याच्या घरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आज सोन्याचे दर जाणून घ्या… आज 08 मार्च 2026 रोजी भारतातील सोन्याच्या दरात वाढ दिसून आली आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम अंदाजे 1,60,000 ते 1,67,000 च्या दरम्यान आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम अंदाजे 1,46,000 ते 1,50,000 च्या दरम्यान आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असून, सोने प्रति 10 ग्रॅम 1.10 टक्के ते 1.25 टक्क्यांनी वधारला आहे.
हेही वाचा- 8th Pay Commission Update : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 8 व्या वेतन आयोगाच्या काळातील पहिल्या 'DA'चा मुहूर्त ठरला; होळीनंतर मोठा निर्णय?
तसेच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम अंदाजे 1,48,000 ते 1,50,000 दरम्यान आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम अंदाजे 1,60,000 ते 1,68,000 च्या वर आहे. तसेच 7 मार्च 2026 रोजी भारतातील चांदीचे दर प्रति किलो अंदाजे 2,68,000 ते 2,85,000 च्या दरम्यान आहेत. चांदीच्या दरात वाढ झाली असून, एका ग्रॅमचा भाव अंदाजे 268 ते 285 पर्यंत आहे. हे दर जागतिक बाजारातील घडामोडी आणि रुपयाच्या मूल्यावर आधारित आहे.
जाणून घ्या शहरानुसार सोन्याचे दर कसे आहेत?
मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1,54,000 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,68,710 आहे. त्याचसोबत पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 1,50,000 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 1,63,640 रुपये आहे. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 1,50,400 रुपये असून 24 कॅरेट सोन्याचा दर 1,57,920 ते 1,62,548 रुपये इतका आहे. नाशिकमध्ये पुणे आणि मुंबईच्या जवळचे दर राहण्याची शक्यता आहे. मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूरमध्ये स्थानिक कर, जागतिक अनिश्चितता आणि मागणीमुळे सोन्याच्या किंमतीत सातत्याने तेजी दिसून येत आहे.