Maharashtra Rain News : मान्सूनपूर्व नागरिकांना उकाड्यापासून दिलासा! मुंबई, कोकणासह अनेक भागात बरसल्या पावसाच्या सरी

मे महिन्यातच राज्यातील नागरीक हैराण झाले होते. अशातच आज, शुक्रवारी मुंबई, कोकणासह उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाच्या सरी बरसल्या आहेत.

Maharashtra Rain News : मान्सूनपूर्व नागरिकांना उकाड्यापासून दिलासा! मुंबई, कोकणासह अनेक भागात बरसल्या पावसाच्या सरी

मे महिन्यातच राज्यातील नागरीक हैराण झाले होते. अशातच आज, शुक्रवारी मुंबई, कोकणासह उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाच्या सरी बरसल्या आहेत. आज सकाळपासून राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याचे पाहायला मिळत असून त्यामुळे दिवसभरात आणखी काही ठिकाणी सरी बसरण्याची शक्यता वर्तवली जात होती. रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा इशारा देण्यात आला आहे. तसेच अहिल्यानगर, सांगली, ठाणे, रायगड, बीड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पुढील 3 दिवस ढगाळ वातावरण असेल अशी शक्यता आहे.

हवामान विभागाने व्यक्त केलेला अंदाज अखेर खरा ठरला असून रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात आज सायंकाळपासून मान्सूनपूर्व सरींना सुरुवात झाली आहे. रायगड मधील दक्षिण भागात माणगाव,महाड म्हसळा श्रीवर्धन परिसरात पावसाच्या सरी बरसल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. आगामी काळात अशाच स्वरूपाचा पाऊस कायम राहिल्यास शेतीच्या कामांना वेग येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा- Mumbai Rain News : चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणाऱ्या मुंबईकरांना काहीसा दिलासा; या भागात बरसल्या पावसाच्या हलक्या सरी

पिंपरी चिंचवड शहरात आज दुपारी चार वाजता दरम्यान विजेच्या कडकडाटासह  जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. भर उन्हाळ्यात पिंपरी चिंचवड शहरात ढगाळ वातावरण आणि विजेच्या कडकडाटासह  जोरदार अवकाळी पावसाच्या सरी पडू लागल्याने पिंपरी चिंचवडकरांना कडाक्याच्या उन्हापासून थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे चाकरमान्याची चांगलीची तारबळ उडाली आहे.

तसेच पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत वातावरणात चांगलाच गारवा निर्माण केला. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची मात्र मोठी तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. विशेषतः कामगार वर्गाची कामावरून घरी परतताना धावपळ झाली, तर अनेक प्रवाशांना पावसापासून बचावासाठी आसरा घ्यावा लागला. काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे दिसून आले. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी अचानक आलेल्या पावसामुळे दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number