Uddhav-Raj Thackeray Interview: "…त्यावेळेस मोदींना वाचवणारे बाळासाहेब ठाकरे होते" मराठी-हिंदू विषयावरून उद्धव ठाकरेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

आज ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा दुसरा दिवस असून मराठी- हिंदू विषयावरून विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी एक किस्सा सांगितला.

Uddhav-Raj Thackeray Interview: &quot…त्यावेळेस मोदींना वाचवणारे बाळासाहेब ठाकरे होते&quot मराठी-हिंदू विषयावरून उद्धव ठाकरेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

राज्यात महानगपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची सामनामध्ये संयुक्त मुलाखत प्रसिद्ध झाली. ही मुलाखत शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार आणि चित्रपट निर्माते, अभिनेते महेश मांजरेकर यांनी घेतली आहे. या मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याची परिस्थिती, मराठी माणसाचे अस्तित्व, मुंबईचे प्रश्न आणि आगामी महापालिका निवडणुका यावर सविस्तर चर्चा केली. दरम्यान आज या मुलाखतीचा दुसरा दिवस आहे. यावेळी संजय राऊत यांनी पहिला प्रश्न उपस्थित केला.

हेही वाचा- Uddhav-Raj Thackeray Interview: “त्यांच्या हातात काही नाही, वर जे दोघे…” मुंबई वेगळी न करण्याच्या फडणवीसांच्या मतावर राज ठाकरेंनी मांडली स्पष्ट भूमिका
यावेळेस उद्धव ठाकरे म्हणाले की, “आम्ही प्रत्येक वेळेस असं म्हणतोय की, महाराष्ट्राचा महापौर हिंदू होईल, पण देवेंद्र फडणीवस काय म्हणतात की, महाराष्ट्राचा महापौर हा हिंदू होईल. म्हणजे भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नाही का? देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही? आणि संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेस मराठी माणसावर गोळ्या झाडणारे मोरारजी देसाई हे हिंदू होते की, नव्हते? मराठी माणूस हिंदू होणार की, नाही हे आता देवेंद्र फडणवीसांनी सांगितल पाहिजे… मराठी माणूस जेव्हा रस्त्यावर उतरला होता तेव्हा मोरारजींनी पोलिसांना सांगितलं की, तुम्हाला माणसे मारण्यासाठी गोळ्या दिल्या आहेत, त्या वाया घालवू नका. त्यातून 107 हुतात्मे झाले जे रेकॉर्डवर आहेत. होय… गोळ्यांचा हिशेब मागितला होता. मग मोरारजी देसाई हे गुजरातमध्ये जन्मलेले हिंदू होते की नव्हते आणि मराठी माणूस हा हिंदू आहे की नाही हे देवेंद्र फडणवीसांनी सांगावं… ज्या वेळी मोदींना अटलबिहारी वाजपेयी केराच्या टोपलीत टाकत होते तेव्हा त्यांना वाचवणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हा अस्सल मराठी माणूस होता. त्यामुळे भाजपनं हिंदू व मराठीमध्ये जी काही गफलत करण्याचा प्रयत्न चालवला आहे तो आधी बंद करावा आणि देवेंद्र फडणवीसांनी सांगावं की मराठी आणि हिंदू म्हणजे काय? कारण मराठी हा हिंदूच आहे.”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number