Gold-Silver Price : भारत बंदाचा थेट परिणाम; सोन्याच्या किमतीत जबरदस्त वाढ, 10 ग्रॅमचा भाव किती?

आज भारत बंदच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे, तरीही दर ऐतिहासिक उच्चांकाच्या आसपासच आहेत. 12 फेब्रुवारी 2026 रोजी भारतातील सोन्याचे भाव अस्थिर आहेत.

Gold-Silver Price : भारत बंदाचा थेट परिणाम; सोन्याच्या किमतीत जबरदस्त वाढ, 10 ग्रॅमचा भाव किती?

आज भारत बंदच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे, तरीही दर ऐतिहासिक उच्चांकाच्या आसपासच आहेत. 12 फेब्रुवारी 2026 रोजी भारतातील सोन्याचे भाव अस्थिर असून, 24 कॅरेट सोन्याचा दर सुमारे 1,58,845 प्रति 10 ग्रॅमवर, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,45,613 प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचला आहे. सोन्याच्या भावात वाढ झाली असून, जागतिक आणि स्थानिक घटकांमुळे हे दर उच्च पातळीवर पोहोचले आहेत.

तसेच चांदीचे दर प्रति किलो सुमारे 2,66,400 ते 3,06,900 च्या दरम्यान आहेत. आज मुंबईत चांदीचा भाव प्रति किलो 2,78,385 च्या आसपास आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे आणि देशांतर्गत सराफा बाजारातही आज सोन्याच्या किमतीत वाढ दिसून आली आहे. सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. भारतीय बाजारात सोन्याच्या घरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आज सोन्याचे दर जाणून घ्या…

हेही वाचा- Vishal-Akshay wedding : ना हॉलची चमक, ना भव्य मैदान; जिथे शिव-पार्वतींचा विवाह झाला, त्याच पवित्र स्थळी विशाल-अक्षयाने पार पाडला मंगलमय सोहळा
जाणून घ्या शहरानुसार सोन्याचे दर कसे आहेत? 
9 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे भाव उच्चांकी पातळीवर असून मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 145,420 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 158,640 प्रति 10 ग्रॅम आहे. तसेच पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 145,420 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 158,640 रुपये आहे. नागपूरमध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 145,420 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 158,640 रुपये इतका आहे. नाशिकमध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 145,420 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 158,640 रुपये आहे. जागतिक बाजारातील घडामोडी आणि भारतीय रुपयाच्या मूल्यातील बदलांमुळे चांदीच्या भावात चढ-उतार होत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number