मंगळवारी (दि.६ जून) ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा सर्वत्र मोठ्या दिमाखात पार पडला. दरम्यान, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वाघनखांबद्दल अतिशय महत्वाचं वक्तव्य केलं आहे.
या आधीही ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी याच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणि जगदंब तलवार महाराष्ट्राच्या मातीत दर्शनासाठी येणार आहेत. अशी घोषणा सुधीर मुनगंटीवारांनी यांनी केली होती. तसंच, छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळाही भव्यदिव्य करणार असल्याचेही ते म्हणाले होते. आणि आता पुन्हा एकदा ‘वाघनखं महाराष्ट्रात आणणार असं म्हणत वाघनखं मिळवण्यासाठी ब्रिटीश सरकारची मंजुरी’ मिळाल्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.