नांदेडमध्ये नदीत आंघोळ करण्यास गेलेले तीन जण पुराच्या पाण्यात बुडाले

नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक नद्या नाल्याचे पाणी वाढले आहे. जिल्ह्यात दोन घडलेल्या घटनान मध्ये तीन जण पुरात बुडाले. यातील एकाचा मृतदेह 24 तासानंतर सापडला आहे आणि बाकी दोघांचा शोध घेत आहेत. नेमकं काय घडलं? नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात ओढ्याला आलेल्या पुरात दोन जण वाहून गेल्याची घटना घडली.धानोरा […]

नांदेडमध्ये नदीत आंघोळ करण्यास गेलेले तीन जण पुराच्या पाण्यात बुडाले

नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक नद्या नाल्याचे पाणी वाढले आहे. जिल्ह्यात दोन घडलेल्या घटनान मध्ये तीन जण पुरात बुडाले. यातील एकाचा मृतदेह 24 तासानंतर सापडला आहे आणि बाकी दोघांचा शोध घेत आहेत.

नेमकं काय घडलं?

नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात ओढ्याला आलेल्या पुरात दोन जण वाहून गेल्याची घटना घडली.धानोरा मक्ता तालुक्यातील बंडू बोनडारे आणि जयराम भुजबळ हे बाईक वरुन घरी निघाले होते.गावाजवळ असलेल्या ओढ्याच्या पुरात दोघेही दुचाकी सह वाहून गेले. या घटनेची माहिती मिळताच त्याचा शोध घेण्याचे काम सुरु केले आहे.

जयराम भुजबळ यांचा मृतदेह मंगळवार दुपारी सापडला.पंरतु बंडू बोनडारे यांचा शोध अजूनही सुरुच आहे.दुसऱ्या घटनेत तालुका किनवट येथील सोहेल खान (20) हा तरुण पैनगंगेच्या नदीत आंघोळ करण्यास गेला होता.त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने सोहेल खान त्या नदीत बुडाला. सोहेल खानचा अजूनही शोध चालू आहे.

नांदेडमधील यंत्रणा कमी पडल्यामुळे नागपुर येथील व्यवस्थापन दलाच्या एका पथकाला पाचारण करण्यात आले आहे.दोन दिवसापासून जिल्ह्यात आणि विष्णुपुरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगलाच पाऊस झाला आहे.

त्यामुळे धरण 100 टक्के भरले आहे. अजुनही पाण्याचा प्रवाह सुरु असल्याने विष्णुपुरी धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number