रेल्वेने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना रेल्वे पासची सक्ती केली होती. रेल्वे प्रशासनाने रेल्वे पासची सक्ती केल्यामुळे प्रवाशांना रेल्वे तिकीट मिळणार नव्हते. मात्र रेल्वने प्रशासनाने दिलेल्या तिकीटविक्रीबाबत दिलेल्या निर्देशात बदल करण्यात आला. आता कोरोना लसीकरण घेऊन १५ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना लोकलने प्रवास करण्यासाठी तिकीट मिळणार आहे.
रेल्वेने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना मासिक रेल्वे पास असण बंधनकारक होते. मात्र आता, कोरोना लसीचे दोन्ही मात्रा पूर्ण झालेल्या आणि १५ दिवस पूर्ण झालेल्या प्रवाशांना रेल्वेप्रवास करण्यासाटी लोकल तिकीट मिळणार आहे.
कोरोना लसीचे दोन्ही मात्रा घेऊन १५ दिवस पूर्ण झालेल्या प्रवाशांना रेल्वेने प्रवास करण्यासाठी रेल्वे तिकीट उपलब्ध व्हावे यासाठी राज्य सरकारने मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला पत्र लिहिले होते. रेल्वेप्रवासासाठी प्रवाशांना तिकीट खिडकी पुन्हा उघडी करण्याची मागणी राज्य शासनाने पत्राद्वारे केली आहे.
रेल्वे प्रशासनाने रेल्वेने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना पासची सक्ती केली होती. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे तिकीट मिळणार नव्हते. तसेच सरकारी कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, वैद्यकीय सेवेतील कर्माचारी यांनासुद्धा रेल्वेने प्रवास करण्यासाठी तिकीट मिळणार नव्हते. रेल्वेने पासची सक्ती केल्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त होत होता. मात्र, आता कोरोना लसीकरण होऊन १५ दिवस झालेल्या प्रवाशांना रेल्वे प्रवास करण्यासाठी तिकीट मिळणार आहे.