उन्हाळ्यात शरीराचा टॅन कमी करण्यासाठी घरी बनवा ‘हा’ नैसर्गिक स्क्रब; मृत त्वचेच्या पेशी होतील स्वच्छ

जेव्हा आपण बाहेर पडता तेव्हा त्वचा टॅन होते, ज्यामुळे हळूहळू त्वचेचा रंग काळवंडतो. तर आज आपण जाणून घेणार आहोत असा नैसर्गिक उपाय, ज्यामुळे तुम्ही घरबसल्या टॅन कमी करू शकता.

उन्हाळ्यात शरीराचा टॅन कमी करण्यासाठी घरी बनवा ‘हा’ नैसर्गिक स्क्रब; मृत त्वचेच्या पेशी होतील स्वच्छ

मुंबई: सध्या उन्हाळा सुरू आहे. अशातच, जेव्हा आपण बाहेर पडता तेव्हा त्वचा टॅन होते, ज्यामुळे हळूहळू त्वचेचा रंग काळवंडतो. या समस्येवर उपाय म्हणून अनेकजण विविध उपाय करत असतात. मात्र, तरीदेखील या समस्यांपासून कितीही प्रयत्न केले तरीही मुक्ती मिळत नाही. तर आज आपण जाणून घेणार आहोत असा नैसर्गिक उपाय, ज्यामुळे तुम्ही घरबसल्या टॅन कमी करू शकता आणि तेही नैसर्गिक स्क्रब बनवून.

बेसन, टोमॅटोचा रस आणि हळद यापासून बनवलेले बॉडी स्क्रब हे फक्त टॅनिंग दूर करत नाही, तर आपल्या त्वचेला सुधारण्यास देखील मदत करते. चला तर हे स्क्रब कसे बनवले जाते ते जाणून घेऊया आणि त्याचे फायदे देखील पाहूया.

टॅन रिमूव्हल बॉडी स्क्रब बनवण्यासाठी लागणारे साहित्यः

2 टीस्पून हरभरा डाळ पावडर  
2 चमचे बेसन  
1 चमचा हळद पावडर  
2 चमचे टोमॅटोचा रस  
गुलाबपाणी किंवा दूध (गरजेनुसार)  

हेही वाचा: पुणेकरांसाठी खुशखबर; पुणे विमानतळावर दहा रुपयात चहा आणि वीस रुपयात कॉफी

नैसर्गिक बॉडी स्क्रब बनवण्याची प्रक्रिया:

सर्वप्रथम, हरभरा डाळ स्वच्छ करून घ्या. त्यानंतर त्याला कोरडे करून भाजून घ्या आणि मग बारीक पावडर बनवा. यानंतर, एका भांड्यात हरभरा डाळीची पूड, बेसन आणि हळद घाला आणि चांगले मिसळा. आता त्यामध्ये टोमॅटोचा रस घाला. जर पेस्ट घट्ट झाली तर थोडे गुलाबपाणी किंवा दूध घालून त्याला पातळ करा. नंतर, या सर्व साहित्यांना छान मिसळा आणि गुळगुळीत पेस्ट तयार करा. ही पेस्ट शरीराच्या टॅन झालेल्या भागांवर लावा आणि 5 ते 10 मिनिटे हलक्या हाताने स्क्रब करा. या पेस्टला टॅन झालेल्या भागावर 15 ते 20 मिनिटांसाठी राहू द्या, नंतर थंड पाण्याने धुवा. आठवड्यातून 2 ते 3 वेळा हे स्क्रब वापरल्यामुळे टॅनिंग कमी होईल आणि त्वचा उजळ होईल.

(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number