घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरला अटक

नालासोपारा तुळींज पोलिसांनी एका सराईत चोरला अटक केली आहे. त्याने तब्बल ११ घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे हा चोर टोळीने नाही तर एकटाच चोरी करण्यात पटाईत आहे. पोलीस तपासात आणखी काही गुन्हे उघडकीस येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. नालासोपारा परिसरात मागील काही दिवसांपासून घरफोड्यांचे प्रमाण वाढत चालले होते. त्या अनुशंगाने पोलिसांनी तपास करत एका […]

घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरला अटक

नालासोपारा तुळींज पोलिसांनी एका सराईत चोरला अटक केली आहे. त्याने तब्बल ११ घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.

विशेष म्हणजे हा चोर टोळीने नाही तर एकटाच चोरी करण्यात पटाईत आहे. पोलीस तपासात आणखी काही गुन्हे उघडकीस येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नालासोपारा परिसरात मागील काही दिवसांपासून घरफोड्यांचे प्रमाण वाढत चालले होते.

त्या अनुशंगाने पोलिसांनी तपास करत एका चोराला अटक करत त्याच्या कडून सोन्या चांदीच्या दागिने मिळून तब्बल ९ लाखाचा माल जप्त केला आहे.

पोलिसांना नालासोपाऱ्यात एक सराईत चोर चोऱ्या करत असल्याची माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी मागील काही घरफोड्यांचा अंदाज घेत नालासोपाऱ्यातील विनायक नगर परिसरातून राहुल मळेकर (३२) या तरुणाला ताब्यात घेतले.

पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याने केलेल्या चोरीचा पाढा वाचून पोलीस सुद्धा थक्क झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या चोरावर मुंबई, ठाणे परिसरात इतरही गुन्हे दाखल आहेत. हा चोर वाटण्या होऊ नये म्हणून एकटाच चोऱ्या करायचा.

चोराला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number