‘हे’ आहेत बैलगाडा शर्यतीसाठी अटी-नियम

बैलगाडा शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनवाणीदरम्यान बैलगाडी शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे बैलगाडा मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तब्बल ७ वर्षांनी राज्यात बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार आहे. मात्र, बैलगाडा शर्यतीसाठी सर्वोच्च न्यायालयाने काही अटी-नियम घालून दिले आहेत. तसेच न्यायालयाने आखलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास आयोजककर्त्यावर कारवाई होण्याचा इशाराही न्यायालयाने दिला आहे. बैलगाडा […]

‘हे’ आहेत बैलगाडा शर्यतीसाठी अटी-नियम

बैलगाडा शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनवाणीदरम्यान बैलगाडी शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे बैलगाडा मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तब्बल ७ वर्षांनी राज्यात बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार आहे.

मात्र, बैलगाडा शर्यतीसाठी सर्वोच्च न्यायालयाने काही अटी-नियम घालून दिले आहेत. तसेच न्यायालयाने आखलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास आयोजककर्त्यावर कारवाई होण्याचा इशाराही न्यायालयाने दिला आहे.

बैलगाडा शर्यतीसाठी अटी-नियम

  • बैलांशी क्रूरपणे वागू नये
  • शर्यतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक
  • बैलाच्या आरोग्य प्रमाणपत्राची गरज

नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

  • शर्यतीच्या नियमांचं उल्लंघन केल्यास ५ लाख रुपये दंड
  • ३ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा
  • नियम मोडणाऱ्या बैलजोडीवर बंदी
  • बंदीनंतर बैलजोडीला शर्यतीत पुन्हा प्रवेश नाही
  • तक्रारदाराला याचिका दाखल करण्याची संधी

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारने याचिका दाखल केली होती. याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. मुकूल रोहतगी यांनी या प्रकरणात राज्य सरकारची बाजू मांडली. या निर्णयानंतर बैलगाडा मालकांनी आनंद व्यक्त केला. चार वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. मात्र, आता ही बंदी उठवण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number