काँग्रेसच्या राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोंदीवर कडाडून टीका केली आहे. नरेंद्र मोदी आणि नथुराम गोडसे हे एकच विचारसरणीचे आहेत, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं आहे. ते केरळमधील वायनाडमध्ये राहुल गांधींनी हे वक्तव्य केलं आहे.
याआधी वायनाडमध्ये राहुल गांधी यांच्या महारॅलीचं आयोजन केलं होतं. सीएए विरोधात ही रॅली काढण्यात आली होती.
या रॅलीला कलपेटातून सुरुवात झाली. या महारॅलीत मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती.
या महारॅलीनंतर एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेदरम्यान राहुल गांधींनी मोदींवर टीका केली.
स्वत:वर विश्वास नसल्याने नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधींना मारलं. गोडसेंनी कधीच कोणावर प्रेम केलं नाही. तसेच त्यांना कोणाचीच पर्वा नव्हती आणि विश्वासही नव्हता.
याच सर्व बाबी पंतप्रधानांबाबतही लागू होतात. मोदींचं प्रेम आणि विश्वास केवळ स्वत:पुरतच असल्याचंही राहुल गांधी म्हणाले.
नरेंद्र मोदी आणि नथुराम गोडसे हे एकाच विचारधारेचे आहेत. या दोघांमध्ये फारसा अंतर नसल्याचंही राहुल गांधी म्हणाले. मी गोडसे भक्त असल्याचं मोदींमध्ये बोलण्याची हिंमत नाही, अशी टीका राहुल गांधीनी मोदींवर केली.
मी भारतीय आहे. भारतीय असल्यासाठी मला कोणीही सर्टिफिकेट देण्याची गरज नाही.
कोण भारतीय आणि कोण अभारतीय हे सांगणारे मोदी कोण आहेत, असा सवालही राहुल गांधींनी केला.
नरेंद्र मोदींकडे बेरोजगारी आणि नोकऱ्यांविषयी विचारल्यावर, ते लक्ष विचलित करुन, दुसऱ्या मुद्द्यावर बोलू लागतात, असंही राहुल गांधी म्हणाले.