राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटची मालिका सुरूच ठेवली आहे. क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणी मलिकांनी एनसीबीचे विभागीय संचलाक समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तसेच मलिकांना आता नवे ट्विट करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत तसेच रविवारी मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचे संकेतही मलिकांनी दिले आहेत.
नवाब मलिकांनी ट्विट केले की, शुभ दिपवली. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. द ललित हॉटेलमध्ये अनेक रहस्य दडलेले आहेत. रविवारी भेटूया. असे ट्विट मलिकांनी केले. त्यामुळे मलिकांनी रविवारी मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचे संकेत दिले आहे. रविवारी मलिक ललित हॉटेलबाबत मोठे वक्तव्य करणार असल्याने संबंधित हॉटेलच्या गुपिताबाबत चर्चेला उधाण आले आहे.
शुभ दीपावली
आप सभी की दिवाली मंगलमय हो होटल 'The Lalit' मे छुपे है कई राज़…
मिलते है रविवार को — Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 3, 2021
मलिकांनी आजही नवे ट्विट करत वानखेडेंवर निशाणा साधला आहे. ‘बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी. लोक बेवजह उदासी का सबब पुछेंगे,’ असे ट्विट मलिकांनी केले आहे. त्यामुळे हे ट्विट करत मलिक वानखेडेबाबत नवा खुलासा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तसेच वानखेडे कुटुंब महागड्या वस्तू वापरत असल्याचे मलिक म्हणाले. समीर वानखेडे सत्तर हजाराचे शर्ट वापरतात तर दोन लाख रुपयांचे बुट वापरतात. एक लाख रुपयांची पँट वापरतात. वानखेडेंच्या मनगटावर लाखो रुपयांचे घड्याळ असते. वानखेडे इतक्या महागड्या वस्तू वापरत असल्याचा आरोप मलिकांनी केला आहे.