‘…मग एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी वेळ का नाही’ – गोपीचंद पडळकर

  क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी आर्यन खानची सुटका करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तात्काळ बैठकीचे आयोजन करतात मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्री बैठक  घेण्यासाठी वेळ का देत नाही? असा प्रश्न उपस्थित करत भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.   ड्रग्ज प्रकरणातून आर्यन खानची सुटका करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि […]

‘…मग एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी वेळ का नाही’ – गोपीचंद पडळकर

  क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी आर्यन खानची सुटका करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तात्काळ बैठकीचे आयोजन करतात मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्री बैठक  घेण्यासाठी वेळ का देत नाही? असा प्रश्न उपस्थित करत भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

  ड्रग्ज प्रकरणातून आर्यन खानची सुटका करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील यांच्यासोबत बैठका घेतात. मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी राज्य सरकारकडे वेळ नाही अशी टीका करत गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले आहे.

  एसटी कर्मचाऱ्यांनी मागण्या पूर्ण करण्यासाठी संपाचे हत्यार उपसले. यादरम्यान ३१ कर्मचाऱ्यांनी आत्महत्यासुद्धा केली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येबद्दल अनिल परब राजीनामा देणार का? असा सवालही पडळकरांनी उपस्थित केला आहे. तसेच आपली जबाबदारी न्यायालयावर ढकलून बाजू काढण्याचे काम सुरू असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number