शेजाऱ्यांकडे घराची चावी ठेवणे पडले महागात

बाहेर जाताना शेजाऱ्यांकडे घराची चावी ठेवणे एका कुटुंबाला चांगलेच महागात पडलंय. या कुटुंबाने आपल्या शेजारीला घराची चावी दिली. या चावीच्या मदतीने शेजारी महिलेने बनावट चावी बनवली. या चावीच्या मदतीने या शेजारी महिलेने मैत्रिणीच्या मदतीने चोरी केली. या चोरी करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली. वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. भारती भगवान असवानी (वय 60) आणि सुवर्णमला […]

शेजाऱ्यांकडे घराची चावी ठेवणे पडले महागात

बाहेर जाताना शेजाऱ्यांकडे घराची चावी ठेवणे एका कुटुंबाला चांगलेच महागात पडलंय. या कुटुंबाने आपल्या शेजारीला घराची चावी दिली.

या चावीच्या मदतीने शेजारी महिलेने बनावट चावी बनवली. या चावीच्या मदतीने या शेजारी महिलेने मैत्रिणीच्या मदतीने चोरी केली.

या चोरी करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली. वानवडी पोलिसांनी अटक केली आहे.

भारती भगवान असवानी (वय 60) आणि सुवर्णमला बूथवेल खंडागळे (वय 59) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. सपना जिग्नेश शहा (38) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

आरोपी आणि फिर्यादी या एकाच सोसायटीत जवळजवळ राहतात. फिर्यादी जेव्हा बाहेर जायच्या तेव्हा तेव्हा त्या भारती असवानी यांच्याकडे घराची चावी ठेवून जायच्या.

दरम्यान भारती असवानी यांनी बनावट चावी तयार केली. जेव्हा जेव्हा शहा कुटुंबीय बाहेर गावी जायचे, तेव्हा तेव्हा दोन्ही आरोपी महिला बनावट चावीने कुलूप उघडायच्या.

घरात प्रवेश करून चोरी करायच्या. हा प्रकार जून 2018 ते फेब्रुवारी 2020 या काळात सातत्याने घडत होतं होता.

या कालावधीत फिर्यादी यांच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सात लाख 42 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरी गेला होता.

दरम्यान घराचे कुलूप न उघडताही चोरी होत असल्याने शहा कुटुंबीय हैराण होते. अखेर या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी त्यांनी बेडरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावला. आणि त्याचा अक्सेस मोबाईलवर घेतला.

त्यानंतर शेजारीच राहणाऱ्या भारती असवानी यांना मुंबईला जात असून घराकडे लक्ष ठेवण्यास सांगितले.

परंतु मुंबईला न जाता ते जवळच असणाऱ्या फ्लॅट राहण्यास गेले. इकडे ते जाताच आरोपी महिलांनी बनावट चावीने कुलूप उघडून घरात प्रवेश केला. बेडरुममधील कपाट उघडून शोधाशोध सुरू केली.

हे सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आणि फिर्यादींच्या मोबाईलमध्ये दिसून आले.

त्यानंतर फिर्यादी यांनी तत्काळ घरी धाव घेतली. आपल्या शेजाऱ्यांना घरात चोरी करताना रंगेहाथ पकडले. या सर्वाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत दोघी आरोपींना अटक केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number