एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरचे व्हायरल संकट टळलं

  विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानात बस्तान ठोकले आहे. यातच आज आझाद मैदानात नाराजीनाट्य पाहायला मिळाले. भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचे नाराजीनाट्य आज पहायला मिळाले. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी एसटी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मात्र व्हायरल मेसेजमुळे या दोन्ही नेत्यांवर संशय व्यक्त केला जात आहे.   सोशल मिडीयावर […]

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरचे व्हायरल संकट टळलं

  विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानात बस्तान ठोकले आहे. यातच आज आझाद मैदानात नाराजीनाट्य पाहायला मिळाले. भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचे नाराजीनाट्य आज पहायला मिळाले. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी एसटी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मात्र व्हायरल मेसेजमुळे या दोन्ही नेत्यांवर संशय व्यक्त केला जात आहे.

  सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या मॅसेजमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी आंदोलनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचा मॅसेज व्हायरल झाला. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी पडळकर आणि खोत यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या एका व्हायरल मॅसेजमुळे या दोन्ही नेत्यांविरोधात संशयाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, आता एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरचे व्हायरल संकट टळले आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांनी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची हातापाया पडून माफी मागितली.

  आज परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यासह एसटी कर्मचाऱ्यांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number