ग्रामस्थांनी गावच काढले विक्रीला

भारताची कृषीप्रधान देश म्हणून ओळख आहे. मात्र, असे असतांनाही शेतमालाला न मिळणारा भाव, नापीकी आणि सातत्याने होणारे नुकसान पाहता बेभरवशाची शेती परवडत नसल्याने नशीक जिल्ह्यातील फुले माळवाडी ग्रामस्थांनी आपले गाव विक्रीला काढले आहे. ऐकावं ते नवलच, आता परभणी जिल्ह्यातील एका गावच्या ग्रामस्थांनी थेट आपले गावच विक्रीला काढले आहे. बरं ते काय एखादी वस्ती किंवा लहान […]

ग्रामस्थांनी गावच काढले विक्रीला

भारताची कृषीप्रधान देश म्हणून ओळख आहे. मात्र, असे असतांनाही शेतमालाला न मिळणारा भाव, नापीकी आणि सातत्याने होणारे नुकसान पाहता बेभरवशाची शेती परवडत नसल्याने नशीक जिल्ह्यातील फुले माळवाडी ग्रामस्थांनी आपले गाव विक्रीला काढले आहे. ऐकावं ते नवलच, आता परभणी जिल्ह्यातील एका गावच्या ग्रामस्थांनी थेट आपले गावच विक्रीला काढले आहे. बरं ते काय एखादी वस्ती किंवा लहान गाव असंही नाही. तब्बल ३ हजार लोकवस्ती असलेलं ते गाव आहे. गाव विक्रीला काढले आहे हे इतरांच्या लक्षात यावे म्हणून येथील ग्रामस्थांनी तसे फलकच लावले आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल नेमके गावकऱ्यांनी हे केले कशासाठी? मात्र, माहेर येथील ग्रामस्थांना आजही मूलभुत सोई-सुविधाच मिळालेल्या नाहीत तर पीक विम्यातूनही या गावाला वगळण्यात आले आहेत. त्यामुळे शासनाचा कोणताच आधार गावाला नसल्याने गावकऱ्यांनी थेट गावच विक्रीला काढले आहे.

माहेर हे परभणी जिल्ह्यातील एक गाव असून त्याची लोकसंख्या ही ३ हजार आहे. गावची लोकसंख्या अधिक आहे शिवाय क्षेत्रफळही जास्त आहे. कर्ज चुकवता येत नसल्याने ग्रामस्थांनी संपूर्ण गावच विकायला काढले आहे. या संदर्भातील ठराव ग्रामस्थांनी पारित केला आहे. या ठरावात आमच्या मागण्या व्हाव्यात आणि कर्जफेड करण्याइतपत उत्पन्न मिळावे. या बाबत सरकारने पुढाकार घ्यावा अशी मागणी माळवाडी ग्रामस्थांनी केली आहे.

देशात नुकतान स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या दिमाखात पार पडला. पण याच देशातील गावची अशी दैयनिय स्थिती असून गावाला साधा रस्ताही नाही. शिवाय पीक विम्यापासून गावाला वंचित ठेवण्यात आले आहे. गाव विक्रीला हे केवळ सांगण्यापुरतेच नाही तर ग्रामस्थांनी तसा फलकही लावला आहे. जर सरकारने विक्रीसाठी परवानगी दिली नाही तर खाजगी राज्याचा दर्जा देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार हे पहावे लागणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number