मुंबई, 2 मे २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्र शाहीर हा बहुचर्चित सिनेमा 28 एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित महाराष्ट्र शाहीर या सिनेमानं पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांची भरगोस प्रतिसाद मिळवला. सिनेमात अभिनेता अंकुश चौधरी शाहीर साबळे यांच्या प्रमुख भूमिकेत आहे. महाराष्ट्र शाहीर निमित्तानं महाराष्ट्राचं लोकसंगीत, लोककला मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली आहे.अंकुश चौधरीच्या भूमिकेचं अनेक प्रेक्षकांनी कौतुक केलं अंकुश चौधरी ते शाहीर साबळे या भूमिकेचा प्रवास कसा होता याचा व्हिडीओ त्याने समाज माध्यमांवर सामायिक केला होता.
शनिवार रविवार आणि महाराष्ट दिनानिमित्त अनेकांना रजा होत्या त्या दरम्यान अनेक नागरिकंनी महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा पाहण्यासाठी सिनेमा गृहात बरीच गर्दी केली.तर आता चक्क अंकुश चौधरी हा सिनेमा गृहाच्या तिकीट खिडकी वर जाऊन स्वतः तिकीट काढत होता. सिनेमातील प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता स्वतः प्रेक्षांची तिकीट काढत होता हे पाहून अनेक प्रेक्षक खूप खुश झाले.
हा सिनेमागृह दादर येथे असल्यामुळे लालबाग,परळ या ठिकाणावरच्या बऱ्याच नागरिकांनी सिनेमा पाहण्यासाठी गर्दी केली होती. या क्षणाचा व्हिडीओ अंकुश चौधरीने त्याच्या समाज माध्यमांवर सामायिक केला. हा व्हिडीओ पाहून हे फक्त मराठी माणूसच करू शकतो, अंकुशचा अभिमान वाटतो, मराठी पाऊल पडते पुढे अशा सुंदर कमेंट्स चाहत्यांनी केलेल्या पाहायला मिळतायत.