केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिराच्या विकास आराखड्यासंदर्भातील कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले. भाषणादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख करत “शिवसेना एकच आहे” असं वक्तव्य केलं.
या वक्तव्यावर ठाकरे गटाकडून जोरदार पलटवार करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे प्रवक्ते अखिल चित्रे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अमित शाह न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वीच निर्णय देत असल्याचा आरोप केला आहे. शिंदे सेना ही भाजपची “टेस्ट ट्यूब बेबी” असल्याची टीकाही त्यांनी केली. तसेच, “जिथे ठाकरे, तिथेच शिवसेना” असा दावा करत खरी शिवसेना ठाकरे यांच्यासोबतच असल्याचे चित्रे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
"शिवसेना एकच आहे" असे सांगण्याची अमित शाहांना एवढी घाई का?
सर्वोच्च न्यायालयात अनेक महत्त्वाचे मुद्दे अद्याप प्रलंबित असताना, अमित शाहांनी आधीच निकाल देऊन टाकला आहे. न्यायालयाचा अंतिम निर्णय येण्यापूर्वीच "एकच शिवसेना आहे" असे जाहीर करणे, हा न्यायप्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा… — Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) June 21, 2026
“शिवसेना एकच आहे” असे सांगण्याची अमित शाहांना एवढी घाई का?
सर्वोच्च न्यायालयात अनेक महत्त्वाचे मुद्दे अद्याप प्रलंबित असताना, अमित शाहांनी आधीच निकाल देऊन टाकला आहे. न्यायालयाचा अंतिम निर्णय येण्यापूर्वीच “एकच शिवसेना आहे” असे जाहीर करणे, हा न्यायप्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न आहे.
खरे तर महाराष्ट्राला संपूर्ण सत्य माहिती आहे, शिंदे सेना ही कुठली स्वाभाविक राजकीय चळवळ नाही. ती भाजपची “टेस्ट ट्यूब बेबी” आहे.
▪️ आपल्याकडून Engineered
▪️ भाजपकडून Nurtured
▪️ विश्वासघातातून Executed
▪️ सत्तेच्या जोरावर Sustained
ज्या पक्षाला स्वतःच्या ताकदीवर शिवसेनेचा सामना करता आला नाही, त्यांनी पक्षफोडीचा मार्ग निवडला. लोकशाही मूल्यांचा आणि बाळासाहेब ठाकरेंनी उभारलेल्या पक्षाचा विश्वासघात करून सत्तेचा खेळ मांडला.
पण नाव, चिन्ह आणि सत्ता मिळवून इतिहास बदलत नाही.
महाराष्ट्राच्या मनात आजही फरक स्पष्ट आहे…
ज्यांनी सत्तेसाठी शिवसेना फोडली, ते गट.
ज्यांनी संकटातही शिवसेनेशी आणि बाळासाहेबांच्या विचारांशी विकले न जाता निष्ठा ठेवली, ती शिवसेना.
निवडणूक आयोग चिन्ह देऊ शकतो, सत्ता पदे देऊ शकते पण जनतेच्या मनातील मान्यता आणि शिवसैनिकांची निष्ठा विकत घेता येत नाही.
शिवसेना दिल्लीच्या राजकीय प्रयोगशाळेत तयार होत नाही. ती महाराष्ट्राच्या मातीत घडते, शिवसैनिकांच्या संघर्षातून उभी राहते आणि ठाकरे नावाशी जोडलेल्या विश्वासातून जगते.
म्हणूनच आजही लाखो शिवसैनिक आणि कोट्यवधी मराठी माणसं एकच गोष्ट ठामपणे सांगतात…
जिथे ठाकरे, तिथेच शिवसेना!
बाकी सर्गळं सत्ता, दबाव आणि पक्षफोडीतून उभे केलेले राजकीय प्रयोग आहेत”