सांगलीत अजित पवार गटाची ताकद वाढणार, भाजपाचे चार माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार

चारही नेत्यांच्या मिरजेत काही बैठका झाल्यानंतर त्यांनी अखेर एकत्र येत राष्ट्रवादी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला.

सांगलीत अजित पवार गटाची ताकद वाढणार, भाजपाचे चार माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार

सांगली: जिल्ह्यात राजकारणाची नवी समीकरणे तयार होण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार अजितराव घोरपडे, विलासराव जगताप आणि राजेंद्रअण्णा देशमुख या चारही दिग्गज नेत्यांचा आज, 22 एप्रिल रोजी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश होणार आहे. या प्रवेशामुळे जिल्ह्याच्या राजकीय पटावर मोठा प्रभाव पडणार आहे.

शिवाजीराव नाईक आणि राजेंद्रअण्णा देशमुख हे सध्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात होते, तर विलासराव जगताप यांनी अलीकडेच भाजपला रामराम ठोकला. अजितराव घोरपडे सध्या कोणत्याही पक्षात सक्रिय नव्हते. या चारही नेत्यांच्या मिरजेत काही बैठका झाल्यानंतर त्यांनी अखेर एकत्र येत राष्ट्रवादी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी थेट चर्चा करून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

या घडामोडीनंतर सांगली जिल्ह्यातील सत्तासमीकरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या फाटाफुटीनंतर अजित पवार गटाला जिल्ह्यात फारसे वजन नव्हते. मात्र, आता चार प्रभावशाली माजी आमदारांचा पक्षप्रवेश झाल्यामुळे या गटाला राजकीय बळ मिळाले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number