राज्यात गेल्या महिनाभरापासून गाजत असलेल्या विधान परिषद निवडणुकांची आज मतमोजणी पार पडत आहे. राज्यातील 17 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत 6 जागांवर बिनविरोध निवडणूक झाल्यामुळं उरलेल्या 11 ठिकाणांचे निकाल आज जाहीर होतील. यावेळी सोलापूर, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड नागपूरचा निकाल, भंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावती, धारशिव-लातूर, बीडमध्ये मतमोजणी होईल. तसेच परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर- हिंगोली, जालन्याचा आज निकाल लागणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूण 17 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीतील सुमारे एक तृतीयांश जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेलेत. त्यामुळे महाराष्ट्रासाठी आजचा दिवस राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वाचा आहे.
यावेळी अमरावती विधानपरिषद निवडणूकांसाठी आज सकाळी 8 वाजता पासून मतमोजणीला सुरुवात झाली असून 451 पैकी 427 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. भाजपाचे उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांचा एकतर्फी विजय होण्याचा अंदाज वर्तावण्यात येत आहे. मतमोजणीसाठी दोन टेबल चार अधिकारी असून दोन तासात सकाळी 10 वाजेपर्यंत अंतिम निकाल घोषित होणार आहे. भाजपकडून प्रवीण पोटे पाटील, काँग्रेसकडून हर्षजीत देशमुख आणि वंचित बहुजन आघाडी कडून निलेश विश्वकर्मा रिंगणात आहे. उमेदवारी अर्ज प्रक्रियेपासून अमरावतीची निवडणूक राज्यात चर्चेत राहिली आहे. यावेळी एकूण सात मतदान केंद्रावर मतदान झाले होते. मतपत्रिकेचे एकूण 25 गठ्ठे तयार करून मतमोजणीची आकडेवारी चेक करणार.
तसेच सांगली सातारा विधान परिषद मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी थोड्याच वेळात सुरू होत आहे. भाजपाचे धैर्यशील कदम आणि राष्ट्रवादी शपचे उमेदवार अभयसिंह जगताप यांच्यात प्रमुख लढत होत आहॆ. सांगलीतील तरुण भारत स्टेडियम येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहॆ. यासाठी 5 टेबलवर 15 अधिकारी कर्मचारी मतमोजणी करणार आहॆ. या मतदार संघात महायुतीचे बलाबल अधिक असल्याने महायुतीचे धैर्यशील कदम यांचा विजय निश्चित मानला जात आहॆ.
जळगाव विधान परिषदेची निवडणूक महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन आणि महा विकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांच्या मधे चुरशीची होईल असे चिन्हे असताना, अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला होता. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या रेशमा काळे यांनी बंडखोरी केल्याने ही निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय बनली होती. मात्र शेवटच्या दिवशी या दोन्ही उमेदवारांनी माघार घेतल्याने,अपेक्षा प्रमाणे महायुती चे उमेदवार नंदकिशोर महाजन आणि महाविकास आघाडीचे शरद तायडे यांच्या मधे लढली गेली आहे. दोन्ही उमेदवारांनी विजयाचे दावे केले असले तरी महायुती चे पक्षीय बलाबल हे महाविकास आघाडीच्या तुलनेत जास्त असल्याने महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचे विजयाचे पारडे जड असल्याचं पाहायला मिळत आहे.
11 ठिकाणांच्या प्रमुख लढती
राज्यातील 11 मतदारसंघातील प्रमुख लढती, आमन-सामने कोण? (Vidhan Parishad Election 2026)
सोलापूर- राजेंद्र राऊत (भाजप) विरुद्ध वसंतराव देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार)
जळगाव- नंदकिशोर महाजन (भाजप) विरुद्ध शरद तायडे (ठाकरेंची शिवसेना) विरुद्ध रेश्मा काळे (शिंदेंची शिवसेना बंडखोर)
सांगली-सातारा- धैर्यशील कदम (भाजप) विरुद्ध अभयसिंह जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार) विरुद्ध किशोर धुमाळ (अपक्ष)
नांदेड- अमर राजूरकर (भाजप) विरुद्ध रामदास पाटील (काँग्रेस)
नागपूर (पोटनिवडणूक)- डॉ. राजीव पोतदार (भाजप) विरुद्ध अतुल लोंढे (काँग्रेस)
भंडारा-गोंदिया- नरेश ईश्वरकर (काँग्रेस पाठिंबा) विरुद्ध अविनाश ब्राह्मणकर (भाजप)
नाशिक- गोकुळ गीते (अपक्ष) विरुद्ध नरेंद्र दराडे (शिवसेना)
अमरावती- हर्षदीप देशमुख (काँग्रेस) विरुद्ध प्रवीण पोटे (भाजप) विरुद्ध निलेश विश्वकर्मा (वंचित )
धाराशिव-लातूर-बीड- बसवराज पाटील (भाजप) विरुद्ध महेश देशमुख (काँग्रेस)
परभणी-हिंगोली- सईद खान (शिवसेना) विरुद्ध डॉ. विवेक नावंदर (ठाकरेंची शिवसेना) विरुद्ध सुशील देशमुख (अपक्ष)
छत्रपती संभाजीनगर-जालना- सुहास शिरसाट (भाजप) विरुद्ध गणेश लोखंडे (ठाकरेंची शिवसेना)