जरांगेंच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली

मनोज जरांगेंच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली<br/>कायदा सुव्यवस्थेचे दिले कारण, आंतरवालीतील ग्रामस्थांचाही होता विरोध

जरांगेंच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली

जालना – सगे-सोयऱ्यांचा कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाची घोषणा केली होती. मात्र त्यांच्या या उपोषणाला आता पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मनोज जरांगे हे शनिवारपासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या आमरण उपोषणाला बसणार होते. मात्र, पोलिसांनी आता त्यांना परवानगी नाकारल्याने आता जरांगे यांच्या भूमिकेकडे लक्ष आहे. जरांगेंच्या या उपोषणाला पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचे कारण आहे. तसेच आंतरवालीतील ग्रामस्थांचाही याला  विरोध होता. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number