मंत्री छगन भुजबळ काल पुण्यात असताना त्यांच्या कार्यकर्त्याच्या मोबाईवर फोन आला. यावेळी समोरच्या व्यक्तीने छगन भुजबळ यांची सुपारी मिळाली असल्याचे सांगत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.
भुजबळांना धमकीचे कृत्य दारूच्या नशेत
जेव्हा धमकीचा फोन आला तेव्हा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखत तांत्रिक तपास केला. पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास या तरुणाला महाडमधून ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत त्याने हे सर्व कृत्य दारूच्या नशेत केले असल्याचे समोर येत आहे. आरोपी तरुण हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील रहिवासी आहे. तो ऑपरेटर म्हणून काम करतो. गुगलवर सर्च करून त्याने भुजबळांच्या पीएचा मोबाईल क्रमांक मिळवला आणि धमकीचा फोन केल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.
काय आहे नेमकं प्रकरण?
मंत्री छगन भुजबळ यांच्यापाठोपाठ मंत्री धनंजय मुंडे यांना देखील जीवे मारण्याची धमकी आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडे यांच्या परळीतील घरी हा धमकीचा फोन आल्याचं सांगतलं जात आहे. यावेळी धमकी देणाऱ्याकडून ५० लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मला ५० लाख रुपये द्या. अन्यथा तुम्हाला जीवे मारिन अशी धमकी फोन करणाऱ्या अज्ञाताने दिली. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. तसंच या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
जेव्हा धमकीचा फोन आला तेव्हा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखत तांत्रिक तपास केला. पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास या तरुणाला महाडमधून ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत त्याने हे सर्व कृत्य दारूच्या नशेत केले असल्याचे समोर येत आहे. आरोपी तरुण हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील रहिवासी आहे. तो ऑपरेटर म्हणून काम करतो. गुगलवर सर्च करून त्याने भुजबळांच्या पीएचा मोबाईल क्रमांक मिळवला आणि धमकीचा फोन केल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.
मंत्री छगन भुजबळ काल पुण्यात असताना त्यांच्या कार्यकर्त्याच्या मोबाईवर फोन आला. यावेळी समोरच्या व्यक्तीनं मला छगन भुजबळ यांची सुपारी मिळाली असलयाचे सांगत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वत:चं नाव प्रशांत पाटील सांगितलं. पोलिसांनी या धमकी देणाऱ्याला अटक केली असून त्याने दारुच्या नशेत असताना धमकी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.