मुंबईची प्रदूषण पातळी चिंताजनक

  कोरोना काळात नागरिकांनी दिवाळी घरातच साजरी केली होती. मात्र यंदाची दिवाळी साजरी करण्यासाठी नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. मात्र दरम्यान मुंबईची प्रदुषण पातळी चिंताजनक स्तरावर पोहचली आहे. बुधवारी मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक २६६ सह वाईट नोंदवला  गेला आहे. तसेच कुलाबा, माझगांव आणि बीकेसी येथील हवा गुणवत्ता निर्देशांकसुद्धा अतिशय वाईट स्तरावर नोंदवला गेला आहे.   दिवाळी […]

मुंबईची प्रदूषण पातळी चिंताजनक

  कोरोना काळात नागरिकांनी दिवाळी घरातच साजरी केली होती. मात्र यंदाची दिवाळी साजरी करण्यासाठी नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. मात्र दरम्यान मुंबईची प्रदुषण पातळी चिंताजनक स्तरावर पोहचली आहे. बुधवारी मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक २६६ सह वाईट नोंदवला  गेला आहे. तसेच कुलाबा, माझगांव आणि बीकेसी येथील हवा गुणवत्ता निर्देशांकसुद्धा अतिशय वाईट स्तरावर नोंदवला गेला आहे.

  दिवाळी निमित्त मुंबईत फटाके फोडण्याचेही प्रमाण वाढणार असल्यामुळे शहरातील प्रदुषणात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मुंबईतील हवा प्रदुषण नियंत्रणात आणण्यासाठी हरित फटाके वाजवण्याचे किंवा पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन पर्यावरणप्रेमींना करण्यात आले आहे.

फटाक्यांच्या किंमतीत वाढ

  कोरोना पार्श्वभूमीवर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे उत्पादन न झाल्याने यंदा बाजारात ठराविकच फटाके उपलब्ध आहेत. तसेच ग्राहकांकडून होणारी फटाक्यांची मागणी पूर्ण करताना विक्रेत्यांची धांदल उडत आहे. तसेच अपुऱ्या साठ्यामुळे फटाक्यांच्या किंमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना फटाके खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number