वसईत दरड कोसळली

दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. वसई पूर्वेच्या राजीवली गावातील वाघराळपाडा भागात एका घरावर दरड कोसळली आहे. दरडीखाली एका घरातील चार जण दाबले गेले आहेत आणि त्यात वडील आणि मुलगी हे दाबले केल्याची दाट शक्यता आहे.दरड घरावर कोसळली व नागरिक अडकले.हे ठिकाण अडगळीचे असल्याने जेसीबी व अन्य यंत्रणा याठिकाणी जाऊ शकत नसल्याने अखेर अग्निशमन […]

वसईत दरड कोसळली

दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. वसई पूर्वेच्या राजीवली गावातील वाघराळपाडा भागात एका घरावर दरड कोसळली आहे. दरडीखाली एका घरातील चार जण दाबले गेले आहेत आणि त्यात वडील आणि मुलगी हे दाबले केल्याची दाट शक्यता आहे.दरड घरावर कोसळली व नागरिक अडकले.हे ठिकाण अडगळीचे असल्याने जेसीबी व अन्य यंत्रणा याठिकाणी जाऊ शकत नसल्याने अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत पहारीच्या सहाय्याने दगड बाजूला करण्याचे काम केले जात आहे.मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे.या पावसामुळे अनके ठिकाणी रस्ते खचले आहेत तर काही ठिकाणी दरड कोसळणाच्या घटना घडताना दिसत आहेत, तर आज सकाळी वसईत दरड कोसळली आहे याची घटना घडली आहे ,तर बचावकार्य सुरु आहे. या दरडीखाली सहा जण अडकले असून चौघांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे.

घरावर दरड कोसळून यामध्ये एकाच कुटुंबातील ४ सदस्य फसले आहेत . त्यातील २ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तर दोघांचा शोध सुरु होता. यापैकी एकाचा मृतदेह हाती लागला आहे. अमित ठाकूर, रोशनी ठाकूर, वंदना ठाकूर, ओमकार ठाकूर हे दरडीत फसले गेले होते. त्यातील अमित ठाकूर यांना बाहेर काढण्यात यश आले. तर वंदना ठाकूर आणि ओमकार ठाकूर जखमी झाले होते, असं सांगण्यात आले असून. अजूनही या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे.

मुसळधार पावसाचा गेल्या काही दिवसांपासून जोर वाढला आहे. सकाळीही वसईत जोरदार पाऊस सुरु असून दरड कोसळण्याच्या घडनाही वाढल्यात. दरम्यान, एमएमआरडीकडून पाईपलाईन काम कऱण्यात आल्यानंतर संरक्षक भिंत बांधली गेली असतील, तर ही दुर्घटना टाळता आली असती, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number