नाशिकमध्ये खूनाचं सत्र सुरूच

नाशिक, २७ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : नाशिक शहरात हत्येचं सत्र सुरूच आहे. दोनच दिवसांपूर्वी अंबड येथील शिवाजी चौकात टोळक्याने पाठलाग करून एका तरुणावर प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात या तरुणाचा मृत्यू झाला. इंस्टाग्रामवर मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल केल्याने हा वाद झाला होता. या वादातून टोळक्यानं तरुणाची हत्या केली. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा […]

नाशिकमध्ये खूनाचं सत्र सुरूच

नाशिक, २७ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : नाशिक शहरात हत्येचं सत्र सुरूच आहे. दोनच दिवसांपूर्वी अंबड येथील शिवाजी चौकात टोळक्याने पाठलाग करून एका तरुणावर प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात या तरुणाचा मृत्यू झाला. इंस्टाग्रामवर मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल केल्याने हा वाद झाला होता. या वादातून टोळक्यानं तरुणाची हत्या केली. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा हत्येची आणखी एक घटना समोर आली आहे.

नाशिकच्या सातपूर परिसरात धारदार शस्त्रानं वार करत तरुणाचा खून करण्यात आला आहे. बबलू सोनवणे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. जुन्या वादातून हा खून झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.

जुन्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांत पोलिसांनी संशयीत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. समशेर सिंग असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या आरोपीचं नाव आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number