काशीद: अलिबाग आणि मुरुड यांना जोडणाऱ्या रस्त्यावर काशीदजवळ असलेला जुना पूल कोसळल्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली होती . काशीद येथील नाल्यावर हा पूल होता. काशीद येथील हा पुल जीर्ण झाला असल्याने त्याच्या दुरुस्तीची मागणी काही वर्षांपासून केली जात होती. मात्र शासन त्याकडे दुर्लक्ष करीत होते. तो पूल कोसळा तेव्हा एक कार आणि चारचाकी वाहन अशी दोन वाहने घटनास्थळी अडकली होती . या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून काहींना दुखापत झाली आहे .
घटनास्थळी अडकलेली दोन्ही वाहने आणि सहा प्रवासी बाहेर काढण्यात आले आहेत , पण त्या मध्ये गंभीर असलेल्या एका प्रवाशाचा मृत्यू झाले आहे . पूल वाहून गेल्या कारणाने वाहतूक विस्कळीत झाली. पूल वाहून गेल्याच्या दुर्घटनेनंतर मुरुड मार्गी जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांना रोहे-सुपेगाव मार्गी पाठवण्यात येत आहे. प्रशासनाने प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केलं आहे.
रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मुरुड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु होता . पावसाचा जोर हळूहळू वाढला आणि त्यामुळे नदीतील पाणी अतिशय जोरदार वेगाने वाहण्यास सुरू झाली. पाण्याच्या वेगाने पुलाचा काही भाग पाण्याबरोबर चक्क वाहून गेला.
पण या वाहनांना बाहेर काढण्यात यश आले आहे. या दुर्घटनेत एक मोटारसायकलस्वार पाण्यात वाहून गेला आहे.मृत्यू झालेली व्यक्ती एकदरा गावाजवळचा रहिवासी असून त्याचे विजय चव्हाण असे होते.