भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस थंडीची तीव्रता कायम राहण्याची शक्यता असून राज्यात गारठा वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात डिसेंबरच्या अखेरीस अनेक भागात गारठा जाणवू लागला. त्यानंतर आता उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात हुडहुडी भरली आहे.
असं असताना पुणे, मुंबई, नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, सांगली, सातारा, विदर्भ, नागपूर, गोंदिया आणि गडचिरोली या भागात तापमानाचा पारा सरासरीपेक्षा खाली घसरल्याने किमान तापमान 2 ते 3 अंश इतका असून काही दिवस थंडीचा कडाका कायम राहणार आहे. यावेळी परभणीमध्ये 6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले असून निफाड येथे 7 अंश सेल्सिअ, धुळ्यात 7.2 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यावेळी 9 आणि 10 तारखेला बिहार, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा, पंजाब, दिल्ली, चंदीगडमध्ये थंडीची तीव्र लाट आली आहे.
तर महत्त्वाचं म्हणजे, पश्चिम बंगालच्या उपसागरात दक्षिणेला चक्रीवादळ आलं हे ठिकाण पदुचेरीपासून 810 किमी अंतरावर आहे. पश्चिम बंगालनंतर हे चक्रीवादळ श्रीलंकेच्या दिशेने वळल असून केरळपासून काही अंतरावर आहे. तसेच याचा फटका महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर देखील पडण्याची शक्यता वर्तावली जात आहे. कोकणा, कोल्हापूर आणि सांगली परिसरात काही दिवस ढगाळ वातावरण राहणार असून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे कोकण किनारपट्टीवरील मच्छिमारांसाठी 5 दिवस खोल समुद्रात न जाण्याच्या विशेष सूचना हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहेत.