राज्यासह पुण्यातही उष्णता वाढली असून तापमान ३५ ते ३८ अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. त्यामुळे पुणेकरांना मार्च महिन्यातच उष्णतेच्या जळी सोसाव्या लागत आहेत. तर पुण्यात वाढत्या उष्णतेमुळे आईस्क्रीम, सरबत, मिल्कशेक यांच्या दुकानांवर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
नागपूरसह विदर्भात पारा दिवसेंदिवस वाढत असून दुपारी घराबाहेर निघाल्यावर सूर्याचे जबर चटके जाणवत आहेत. नागपूरसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यात उष्णता वाढली असून नागपूरमध्ये आज तापमान ४० अंश सेल्सिअसवर आहे तर अकोला चंद्रपूर जिल्ह्यातील पारा ४३ अंश सेल्सिअसवर आहे. राज्यातील हवामानात बदल झाले असून मार्च महिन्याच्या अखेरिस वाढणारी उष्णता यंदा महिन्याच्या सुरुवातीलाच वाढल्यामुळे नागरिकांना उष्णतेच्या झळी सोसाव्या लागत आहेत. तसेच आणखी दोन दिवस उष्णता वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
अकोला ४२.०७
जळगाव ४२.०६
वर्धा ४१.०४
नागपूर ४०.०४
अमरावती ४१.०४
सोलापूर ४१.०६
नाशिक ३९.०१
सांगली ४०.०४
कोल्हापूर ३९.०५
गोंदिया ३९.०८