राज्यात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण

भारतात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन विषाणूने शिरकाव केला आहे. अशातच आता राज्यात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला आहे. दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या तरुणाला ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाली असल्याचे समोर आले आहे. मुंबईतील डोंबिवलीमध्ये ३३ वर्षीय तरुणाला ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी हा रुग्ण हाय रिस्क देशातून मायदेशी परतला होता. २४ नोव्हेंबर रोजी हा […]

राज्यात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण

भारतात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन विषाणूने शिरकाव केला आहे. अशातच आता राज्यात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला आहे. दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या तरुणाला ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाली असल्याचे समोर आले आहे.

मुंबईतील डोंबिवलीमध्ये ३३ वर्षीय तरुणाला ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी हा रुग्ण हाय रिस्क देशातून मायदेशी परतला होता. २४ नोव्हेंबर रोजी हा रुग्ण केपटाऊन शहरातून कल्याण-डोंबिवली येथे आला. रुग्णाने दक्षिण आफ्रिका, दिल्ली, मुंबई असा प्रवास केला होता.

डोंबिवलीमध्ये सापडलेल्या या रुग्णाने कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नाही. तसेच या रुग्णाच्या अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला असून त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र सुदैवाने सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. या रुग्णाने दिल्ली ते मुंबई असा विमान प्रवास केला होता. त्यामुळे या प्रवासातील संपर्कात आलेल्या २५ सहप्रवाशांचीही कोरोना चाचणी करण्यात आली, मात्र या सर्वांची चाचणी निगेटिव्ह आली आहे.

सर्वप्रथम कर्नाटकमध्ये ओमायक्रॉनचे दोन रुग्ण सापडले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली होती. त्यानंतर शनिवारी गुजरातमधील जामनगरमध्ये ओमायक्रॉनचा तिसरा रुग्ण आढळला होता. आणि आज कल्याण-डोंबिवलीमध्ये ओमायक्रॉनचा नवा रुग्ण आढळल्यामुळे आता देशातली ओमायक्रॉन रुग्णांची एकूण संख्या चार झाली आहे. ओमायक्रॉन विषाणूची संसर्ग क्षमता जास्त असल्याने आरोग्य यंत्रणाही काळजीत आली आहे.

तसेच ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेने ऍक्शन प्लान तयार केला आहे. तसेच मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे तसेच प्रत्येकाने लसीकरण घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number