पुणे : नसरापूरमधील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेले. या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या घटनेत आपला जीव गमावलेल्या पीडितेच्या वडिलांनी वेळोवेळी आपली उद्वीग्न भावना माधम्यांसमोर व्यक्त केली आहे. तसेच इंस्टाग्रामवरील पोस्टद्वारेदेखील आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. या सुनावणीदरम्यान न्यायालयात येणाऱ्या अनुभवांबाबत नुकतीच एक पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. याद्वारे न्याय व्यवस्थेवर त्यांनी भाष्य केले आहे.
काय म्हटले आहे पोस्टमध्ये –
"एक मुलीचा बाप म्हणून न्याय व्यवस्थेला माझा एक प्रश्न आहे. परवा 2-3 वेळा कोर्टात जाण्याचा योग आला. गुन्हेगाराला पहिला प्रश्न कुठला विचारला जातो, माहितीए. की पोलिसांकडून तुम्हाला काही त्रास आहे का. जशी न्यायाची प्रक्रिया गुन्हेगाराला जाणवते, तशी समोरच्या कुटुंबालाही जाणवायला हवी ना. समाज जागा झाला पाहिजे. न्याय फक्त कागदावर नाही तर प्रत्येक लोकांच्या विश्वासात दिसला पाहिजे."