‘येत्या दोन दिवसात सर्वांना अपेक्षित निर्णय होणार’

अहमदनगर, ३ जुलै २०२३, प्रतिनिधी: राज्याच्या राजकारणात अजित पवार यांनी दुसरा महाभूकंप केला आहे. अजित पवार यांनी भाजप सोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यावेळी अहमदनगरच्या पारनेर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे देखील त्यांच्या सोबत होते, अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप हे देखील त्यांच्यासोबत होते. दरम्यान या सर्व आमदारांच्या काय प्रतिक्रिया आहेत याकडे […]

‘येत्या दोन दिवसात सर्वांना अपेक्षित निर्णय होणार’

अहमदनगर, ३ जुलै २०२३, प्रतिनिधी: राज्याच्या राजकारणात अजित पवार यांनी दुसरा महाभूकंप केला आहे. अजित पवार यांनी भाजप सोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यावेळी अहमदनगरच्या पारनेर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे देखील त्यांच्या सोबत होते, अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप हे देखील त्यांच्यासोबत होते. दरम्यान या सर्व आमदारांच्या काय प्रतिक्रिया आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि शरद पवार यांचे कट्टर समर्थक निलेश लंके यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे.

निलेश लंके यांनी एक फेसबुक पोस्ट केलीये ज्यात त्यांनी म्हंटलंय…
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे माझे कुटुंब असून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब,मा.अजितदादा पवार आणि मा.सुप्रियाताई सुळे हे आमचे नेते आणि कुटुंब प्रमुख आहेत.ह्या कुटुंबातील मी एक अतिशय छोटा घटक आहे. सद्याच्या बदलेल्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेते मंडळींनी एकत्र राहावे अशी माझी भूमिका आहे. तरी येणाऱ्या दोन दिवसात सर्वाना अपेक्षित असा निर्णय होईल अशी मी अपेक्षा बाळगतो!” अशी पोस्ट निलेश लंके यांनी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number