मुख्यमंत्री घेणार मंत्र्यांचे क्लास

शिस्त, पारदर्शक कारभार आणि कामातील काटेकोरपणा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परिचीत आहेत.

मुख्यमंत्री घेणार मंत्र्यांचे क्लास

मुंबई : शिस्त, पारदर्शक कारभार आणि कामातील काटेकोरपणा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परिचीत आहेत. सामान्य माणसाला नजरेसमोर ठेवून राजकारण्यांनी काम करण्याचा त्यांचा नेहमी आग्रह असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदर्शाचा कित्ता गिरवणाऱ्या फडणवीसांनी देखील नेहमी स्वतःला जनतेचा सेवक म्हणूनच संबोधले आहे. मुख्यमंत्री म्हणून आता दुसरी टर्म मिळताच त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळासाठी आचारसंहिता जाहिर केली आहे. मंत्रिमंडळाचा शपथविधी होताच त्यांनी प्रत्येक विभागाचा 100 दिवसांचा आराखडा तयार केला होता. त्याच्या बैठका घेवून त्यातून प्रत्येक मंत्र्यांचा आणि त्यांच्या विभागाचे प्रगती पुस्तक तयार केले जाणार आहे. आता फडणवीस यांनी प्रशासकीय कामाला शिस्त लावण्यासाठी नवे निर्देश दिले आहेत. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
 

मुख्यमंत्र्यांचे निर्देश काय?

मंत्र्यांचं कामकाज ठरलेल्या वेळापत्रकानुसार करणं अनिवार्य
भाजप मंत्री सोमवार ते बुधवार मुंबईमध्ये उपस्थित राहणार.
गुरूवारी आणि शुक्रवारी राज्यभरात विभागाच्या कामाचा आढावा घ्यावा
शनिवारी आणि रविवारी आपापल्या मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावावेत
विभागात सुरू असणाऱ्या सुनावण्या प्रलंबित न ठेवता पूर्ण कराव्यात
मंत्र्यांनी अधिक वेळ काम करून सर्व प्रशासकीय कामे पूर्ण करावीत

हेही वाचा : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी सुरु होणार

मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपाच्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातील कामांसदर्भात जसे वेळापत्रक दिले आहे, तसेच भाजपाच्या मंत्र्यांना पक्षाच्या कामासाठीही निर्देश देत पक्षाच्या कामासाठी वेळ देण्याचे आणि पक्ष आणि सरकारमधील समन्वय वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा : माझ्याविरोधात मिडिया ट्रायल; धनंजय मुंडेंचा आरोप
 

सरकार आणि संघटनेत समन्वय साधा 

सरकारमार्फत कामे करताना भाजपची संघटना मजबुतीसाठी प्रयत्न करा
मंत्र्यांनी संघटनेमार्फत आलेली लोकोपयोगी कामे मार्गी लावावीत 
भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्र्यांची दर पंधरवड्याला आढावा बैठक होणार
या बैठकीत पक्षाच्या कामांचा आढावा सादर करावा लागणार
यासर्व कामांचा एक अहवाल मंत्र्यांना सादर करावा लागेल
मंत्री कशा पध्दतीने काम करतात, यावर त्यांचे प्रगतीपुस्तक तयार होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाला पूर्ण शिस्त लावण्याचे प्रमान काढले आहे. आता केवळ भाजपाला नाहीतर त्यांच्यासोबत असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी या घटक पक्षाला या आचारसंहितेतच काम करावे लागणार आहे. महायुतीच्या शपथविधी समारंभानंतर महायुतीने 'आता थांबणार नाही' असा नारा दिला होता. त्या दृष्टीने मुख्यमंत्री फडणवीस यांनी नवे फर्मान दिले असून त्याबाबत राजकीय चर्चा सुरू झाली आहे. लोकांसाठी काम करताना अशा शिस्तीच्या कामाची अपेक्षा सामान्यांना असते. मुख्यमंत्र्यांच्या आचारसंहितेचे काम किती परिणामकारक ठरलं तर नक्कीच महाराष्ट्रात सुशासन येईल. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number