राज्यातील महानगपालिका या निवडणुकीत एकूण 227 प्रभागांसाठी मतदान होणार आहे. मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान तसेच 16 जानेवारी 2026 ला मतमोजणी होणार आहे. मंबई महानगपालिका निवडणुकांची लगबग सुरु असताना भाजपमध्ये मोठी घडामोड घडली आहे. भाजपने महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर तब्बल 26 जणांवर निलंबनाची कारवाई केली. यात अनेक माजी नगरसेवकांचा आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असून बंडखोरीमुळे भाजपने या सर्व नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर उमेदवारी अर्ज भरण्यावरून भाजपमधील नाराज उमेदवारांची पक्षाकडून समजूत काढून देखील पक्षाकडून समजूत काढून देखील बंडखोरी कायम ठेवण्यात आली. यामुळे मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी बंडखोर पक्षनेत्यांना पुढील 6 वर्षांसाठी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून काढून टाकण्यात आल्याचे आदेश जारी केले आहेत.
पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करणे आणि महायुतीच्या उमेदवारांना सहकार्य न करणे, या कारणास्तव भाजपने हा मोठा निर्णय घेतला आहे. निलंबित करण्यात आलेल्या बंडखोरांमध्ये दिव्या ढोले, नेहाळ अमर शाह, जान्हवी राणे, असावरी पाटील, मोहन आंबेकर, प्रशांत ठाकूर, जयमुर्गन नाडर, दिवेश यादव, विनित सिंग, अयोध्या पाठक, सरबजीत सिंग संधू, सुचित्रा संदीप जाधव, अमित शेलार, राकेश कोहेलो, सुशील सिंग, सुषमा देशमुख, सिद्धेश कोयंडे आदी यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. या बंडखोरीमुळे महानगरपालिका निवडणुकीत कोणाला फटका बसणार हे पुढील निकालांमध्ये स्पष्ट होईल.