आज नवी दिल्लीमध्ये ऐतिहासिक विजय चौकात आज ‘बीटिंग द रिट्रीट’ सोहळा पार पडला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत सशस्त्र दलाच्या सैन्यांच्या संगीताच्या धूनवर हा सोहळा पार पडला. या सोहळ्यात विविध सुरावटी ऐकायला मिळाल्या. या सुरावटीपैकी अनेक सूर हे देशी होते आणि हेच सूर यावर्षीच्या ‘बीटिंग द रीट्रिट’ सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले. या सोहळ्यादरम्यान ‘ऐ मेरे वतन के लोगों’ ही सुरावट प्रथमच राजपथावर वाजवली गेली. तसेच याच्या जोडीला सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या आघाडीसाठी वापरले जाणारे ‘कदम कदम बढाए जा’ ही सुरावटही वाजवण्यात आली.
पाहा हा व्हिडिओ :
https://www.youtube.com/watch?v=JmOlgWiZ5lQ