‘सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे’

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रभू श्रीरामाची नगरी अयोध्येत पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अयोध्येत आले आहेत. शिवसेनेचे गटनेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचा अयोध्या दौरा भारतीय जनता पक्षाने पुरस्कृत केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. तसेच महाराष्ट्रामध्ये गेल्या ७२ तासांपासून अवकाळी पाऊस आणि […]

‘सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे’

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रभू श्रीरामाची नगरी अयोध्येत पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अयोध्येत आले आहेत. शिवसेनेचे गटनेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचा अयोध्या दौरा भारतीय जनता पक्षाने पुरस्कृत केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

तसेच महाराष्ट्रामध्ये गेल्या ७२ तासांपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंढ नुकसान झाले आहे. पण सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून धर्माच्या नावावर पर्यटनाला गेले असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत पुढे म्हणाले,’मीही अनेकदा अयोध्येला गेलो आहे, पण बाबरी प्रकरण घडले तेव्हा भाजप आमच्यासोबत आला नाही, मग ते पळून गेले. गेले आणि आता गद्दारांची बोटे धरून जात आहेत. अशा लोकांना भगवान श्रीरामाचा आशीर्वाद मिळत नाही.’

संजय राऊत म्हणाले की, संजय राऊतांनी अवकाळी पावसामुळे नुकसानीचा सामना करावा लागलेल्या राज्यातील शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला. मिंधे सरकार भारतीय जनता पक्षाबरोबर अयोध्येला गेले यात आनंद आहे. पण संपूर्ण सरकार अयोध्येमध्ये आहे आणि राज्यात गेल्या ७२ तासांत अवकाळी आणि गारपीटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मराठावाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे.

मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र सर्वत्र शेतकऱ्यांचा हाहाकार उडालेला आहे. नुकसान भरपाईसंदर्भात सरकारने अधिवेशन काळामध्ये काही घोषणा केल्या होत्या. अधिवेशन संपताच आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊ आणि नुकसान भरपाई संदर्भात काही भूमिका घेऊ, असे सांगितले होते. पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे सरकार धर्माच्या नावावर पर्याटनाला गेले आहेत. यांना प्रभू श्रीरामाचा यांना आशीर्वाद अजिबात मिळणार नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number