Thalapathy Vijay: मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्याच भाषणात थलपती विजय खोटं बोलले? वर्गमित्रानेच केला मोठा खुलासा; म्हणाले, “तो बोलतोय ते बकवास…”

तमिळनाडूचे मुख्यमंत्री झाल्यानंतर थलपती विजय यांच्या गरिबीबाबतच्या वक्तव्यावर त्यांचे वर्गमित्र मनू जोसेफ यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

Thalapathy Vijay: मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्याच भाषणात थलपती विजय खोटं बोलले? वर्गमित्रानेच केला मोठा खुलासा; म्हणाले, “तो बोलतोय ते बकवास…”

तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थलपती विजय यांनी नुकतीच तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर केलेल्या भाषणाची जोरदार चर्चा सुरू आहे. आपल्या पहिल्याच भाषणात विजय यांनी आपण गरिबी आणि उपासमारी जवळून अनुभवली असल्याचं सांगितलं होतं. मात्र त्यांच्या या वक्तव्यावर आता त्यांच्या जुन्या वर्गमित्रानेच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. लेखक, पत्रकार आणि वेब सिरीज निर्माते मनू जोसेफ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत विजय यांच्या दाव्यावर टीका केली आहे. “विजय माझ्यासोबत लॉयोला शाळेत शिकत होता. तो गरिबीत वाढला, हे पूर्णपणे खोटं आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला. या पोस्टनंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून चाहत्यांमध्येही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

नेमकं काय म्हणाले मनू जोसेफ?

मनू जोसेफ यांनी आपल्या पोस्टमध्ये विजयच्या बालपणाचा उल्लेख करत त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सामान्य नव्हती, असं म्हटलं. विजयचे वडील चित्रपट निर्माते होते आणि त्यांनी मुलाला अभिनय क्षेत्रात संधी मिळवून देण्यासाठी मदत केली, असंही त्यांनी नमूद केलं.

jm

त्यांच्या मते, चित्रपट निर्मात्यांना काही वेळा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो, पण त्याची तुलना खऱ्या गरिबीशी करता येणार नाही. “अनेक श्रीमंत घरातील मुलं आर्थिक चढ-उतारांना गरिबी समजतात. पण प्रत्यक्ष गरिबी वेगळी असते,” अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली.

हेही वाचा: Rahul Gandhi Instagram Post: …अन् अवघ्या काही वेळातच इन्स्टाग्रामकडून राहुल गांधी आणि ‘थलपती’ विजय यांची 'ती' पोस्ट ब्लॉक; काँग्रेसकडून मोठा दावा

मुख्यमंत्री म्हणून विजयचं पहिलं भाषण चर्चेत

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विजय यांनी आपल्या भाषणात संघर्ष, मेहनत आणि सामान्य कुटुंबातून पुढे आल्याचा उल्लेख केला होता. “मी एका साध्या चित्रपट निर्मात्याचा मुलगा आहे. मेहनतीच्या जोरावर मी हे स्थान मिळवलं,” असं ते म्हणाले होते. याशिवाय भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेत, “मी स्वतः भ्रष्टाचार करणार नाही आणि इतरांनाही करू देणार नाही,” असं स्पष्ट विधान त्यांनी केलं होतं. त्यांच्या या भाषणाचं अनेकांनी स्वागत केलं, तर काहींनी त्यातील दाव्यांवर प्रश्न उपस्थित केले.

कोण आहेत मनू जोसेफ?

मनू जोसेफ हे प्रसिद्ध लेखक आणि माजी पत्रकार आहेत. त्यांच्या ‘सिरियस मेन’ या कादंबरीवर चित्रपटही तयार करण्यात आला होता. तसेच त्यांनी अनेक चित्रपट आणि वेब सिरीजसाठी लेखन व दिग्दर्शन केलं आहे. नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय शो ‘डिकपल्ड’मुळेही ते चर्चेत आले होते.

हेही वाचा: CM Vijay Meet MK stalin: तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले जोसेफ विजय; भेटीचा व्हिडीओ व्हायरल, सर्वच स्तरात होतंय कौतुक

सोशल मीडियावर दोन गट

या संपूर्ण प्रकरणानंतर सोशल मीडियावर विजय समर्थक आणि विरोधक असे दोन गट पडल्याचं पाहायला मिळत आहे. काही जण मनू जोसेफ यांच्या दाव्याला समर्थन देत आहेत, तर अनेक चाहत्यांनी विजय यांच्या संघर्षाचा बचाव केला आहे. दरम्यान, विजय किंवा त्यांच्या पक्षाकडून अद्याप या टीकेवर अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number