उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत ठाकर समाजाचे नेते मारुती मेंघाळ शिवसेनेत पक्षप्रवेश

अकोले तालुक्यातील आदिवासी ठाकर समाजातील युवा नेते मारुती मेंगाळ यांच्यासोबत इतर पक्षातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत.

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत ठाकर समाजाचे नेते मारुती मेंघाळ शिवसेनेत पक्षप्रवेश

अहिल्यानगर: सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात नवनवीन घडामोडी पाहायला मिळत आहेत. काही नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. अशातच, अकोले तालुक्यातील आदिवासी ठाकर समाजातील युवा नेते मारुती मेंगाळ यांच्यासोबत इतर पक्षातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असल्यामुळे शिवसेना शिंदे गट आणखी भक्कम होणार, अशी चर्चा रंगत आहे.

हेही वाचा: भूस्खलनामुळे 1000 हून अधिक पर्यटक सिक्कीममध्ये अडकले
 

नुकताच, अकोले तालुक्यातील आदिवासी ठाकर समाजाचे युवा नेतृत्व आणि पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट घेतली. शिंदे यांच्या नेतृत्वात प्रवेश करणार असल्याची माहिती स्वतः ठाकर समाजातील युवा नेते मारुती मेंगाळ यांनी जाहीर केली आहे. यादरम्यान, आदिवासी ठाकर समाजाचे युवा नेते मारुती मेंगाळ यांनी तालुक्यातील 60 ग्रामपंचायतींचे सरपंच, काही पंचायत समिती सदस्य, तसेच भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तालुक्यातील काही सहकारी संस्थांचे संचालक यांच्या यादी एकनाथ शिंदे यांना दिली आहे. माहितीनुसार, हा भव्य पक्ष प्रवेश सोहळा शनिवारी ठाणे येथे पार पडला.

शिवसेना शिंदे गटात इतक्या मोठ्या प्रमाणावर हा प्रवेश सोहळा झाल्यामुळे तालुक्यात मोठा बदल होणार आहे. ठाकर समाजातील युवा नेते मारुती मेंगाळ हे आदिवासी भागातील ठाकर समाजाचे जरी नेतृत्व करत असले तरी त्यांचा बहुजन समाजावरही छाप आहे, त्यामुळे बहुजन समाज त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहतो. ठाकर समाजातील युवा नेते मारुती मेंगाळ अकोले पंचायत समितीचे उपसभापती असताना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामामुळे उपसभापती नावानेच त्यांची ओळख झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number