मुंबई : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसला. मविआमध्ये सर्वाधिक जागा शिवसेना उबाठाला मिळाल्या. ठाकरेसेनेनं 20 जागा जिंकल्या. विधानसभेत पानीपत झाल्यानंतर आता पक्षातील अनेक नेते महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा सूर आळवल्याच्या बातम्या येत होत्या. त्या बातम्या पूर्णतः निराधार असल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. ठाकरे गट महाविकास आघाडी सोबतच असल्याचा दावाही राऊत यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला फटका बसला आहे. विधानसभेत महाविकास आघाडीला 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकलानंतर ठाकरेंच्या सेनेला 20 जागा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला 16 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला 10 जागा मिळाल्या आहेत. महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा ठाकरेंच्या सेनेला मिळाल्या आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंची सेना महाविकास आघाडीतून बाहेर पडणार अशा चर्चा होत्या. मात्र संजय राऊत यांनी यावर भाष्य केले आहे. ठाकरे गट महाविकास आघाडीतच राहणार असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. राऊतांच्या या वक्तव्यामुळे ठाकरे गट मविआतून बाहेर पडणार असल्याच्या राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुती मोठा विजय मिळाला. तर महाविकास आघाडीला मोठा पराजय पत्कारावा लागला. महाराष्ट्रात 288 मतदारसंघात आहेत. त्यापैकी 230 मतदारसंघात महायुतीने बाजी मारली आहे. तर मविआला 46 जागाही मिळवता आलेल्या नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात मविआचा जोरदार पराभव झाल्याच्या राजकीय चर्चा सुरू झाल्या. त्यातच मविआमध्ये ठाकरेंच्या सेनेला इतर मित्रपक्षांच्या तुलनेत जास्त जागा मिळाल्या. त्यामुळे उद्धव ठाकरे मविआतून बाहेर निघतील अशा चर्चा होत्या. मात्र राऊतांनी त्या चर्चांना पूर्ण विराम दिला आहे.