दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला मिळालेल्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी आणि आंदोलकांवर झालेल्या कथित पोलिसी कारवाईचा निषेध करण्यासाठी ठाकरे बंधूंकडून 26 जुलै रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथे सकाळी 10 वाजल्यापासून तिरंगा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात आवाहन करत म्हटले की, “हा मेळावा कोणत्याही राजकीय पक्षासाठी किंवा विचारसरणीसाठी नसून देश, लोकशाही आणि संविधानासाठी आहे,” असे म्हटले आहे. तसेच विद्यार्थी आंदोलक अभिजित दिपके आणि आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व तरुणांचे कौतुक करत, लोकशाहीच्या रक्षणासाठीचा हा लढा असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान दादर वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून दादर परिसरातील राहणाऱ्या लोकांसाठी महत्वाची सूचना देण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आज मोठ्या संख्येने विद्यार्थी कॉक्रोज जनता पार्टी आणि लाखो विद्यार्थी आंदोलकांच्या विजयी रैलीमध्ये दादर येथील शिवाजी पार्कमध्ये जमणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बरोबर अनेक राजकीय पक्ष देखील या आंदोलनामध्ये सहभाग होणार आहेत.
यादरम्यान दादर वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून दादर शिवाजी पार्क मधील राहणाऱ्या लोकांना नम्रतेने आव्हान करण्यात येत आहे की, आज आपली गाडी रस्त्यावर लावू नये. तसेच दादर परिसरातील नागरिकांसाठी रस्ते बंद, वाहतूक वळवणे आणि नो-पार्किंगबाबतचे नियम लागू केले आहेत. दादर परिसरातील रहिवाशांनी घराबाहेर पडताना पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करावेस अशी विनंती वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.