Shital Mhatre : ठाकरे बंधूंच्या युतीआधीच राजकीय धुरळा; शीतल म्हात्रेंनी ठाकरे बंधूंना बोचरे प्रश्न विचारले

ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच्या घोषणेनंतर शिवसेना शिंदे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.

Shital Mhatre : ठाकरे बंधूंच्या युतीआधीच राजकीय धुरळा; शीतल म्हात्रेंनी ठाकरे बंधूंना बोचरे प्रश्न विचारले

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून ठाकरे बंधू आज एकत्र येणार असल्याची औपचारिक घोषणा पत्रकार परिषदेतून होणार आहे. या पार्श्वभूमीवर जय महाराष्ट्र न्यूजने शिवसेना नेत्या (एकनाथ शिंदे गट) शितल म्हात्रे यांच्याशी संवाद साधला.

या संवादात शितल म्हात्रे यांनी ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवर तीव्र टीका केली. त्या म्हणाल्या की, ही युती महाराष्ट्राच्या भविष्यासाठी नसून स्वतःच्या मुलांचे राजकीय भवितव्य सुरक्षित करण्यासाठी होत आहे. मराठी अस्मिता, मराठी संस्कृती यांचा केवळ बोलण्यात वापर केला जात असून प्रत्यक्षात सत्तेची लालसा हेच या युतीमागील खरे कारण आहे, असा आरोप त्यांनी केला. “आज बारा वाजता ठाकरे बंधू एकत्र येत असले तरी येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनता त्यांचे ‘बारा’ वाजवल्याशिवाय राहणार नाही,” असा ठाम विश्वास शितल म्हात्रे यांनी व्यक्त केला.

नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी महाराष्ट्र उभा असल्याचे स्पष्ट झाले असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपसोबतची युती ही बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या विचारधारेनुसारच असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. ज्या मनसे पक्षावर “संपलेला पक्ष” अशी टीका केली जात होती, त्याच पक्षासोबत आज युती करावी लागत असल्याने ठाकरे बंधूंची सत्तेसाठीची लालसा उघड झाली आहे, असा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा: Vijay Hazare Trophy 2025 : 36 चेंडूत शतक…वय फक्त 14 वर्ष ! विजय हजारे ट्रॉफीत वैभव सूर्यवंशीने रचला जागतिक विक्रम

मागील निवडणुकांच्या वेळी बाळा नांदगावकर तासंतास मातोश्रीवर जाऊन बसत असताना “वेळ नाही” असे उत्तर दिले जात होते. मनसेचे निवडून आलेले नगरसेवक फोडण्याचे काम तत्कालीन शिवसेनेने केले, हे महाराष्ट्र विसरलेला नाही, असेही त्यांनी नमूद केले. “एकत्र यायचेच होते, तर वेगळे का झाला होता? आणि जर ‘बडव्यांमुळे’ तुम्ही बाहेर पडलात, तर ते बडवे नेमके कोण होते, हे महाराष्ट्राला आधी सांगा,” असा थेट सवाल शितल म्हात्रे यांनी केला. मुंबई महानगरपालिका ही ‘सोन्याचे अंडे देणारी कोंबडी’ असून, मुंबईच्या तिजोरीवर डल्ला मारण्यासाठी आणि सत्ता मिळवण्यासाठीच ही युती होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

मुंबईकरांना चांगले माहीत आहे की रस्त्यावर उतरून काम करणारे कोण आहेत आणि घरात बसून केवळ शहाणपणा शिकवणारे कोण आहेत. ‘लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून असंख्य महिलांचे कल्याण करण्यात आले असून, मुंबईकरांचा महत्त्वाचा घरांचा प्रश्न एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोडवण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी जागावाटपाबाबतही माहिती दिली. एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांनी मिळून जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला असून, तो आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. जागावाटपाचा तिढा पूर्णपणे सुटलेला असून, दोन्ही पक्षांमध्ये शांततेत आणि समन्वयाने निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना एकनाथ शिंदे गटासाठी 2500 पेक्षा अधिक इच्छुक उमेदवार मुलाखतीसाठी आले होते. सत्तेमध्ये कोण येणार आहे, याची कल्पना इच्छुकांना असल्यामुळेच ही मोठी गर्दी पाहायला मिळाली, असे त्यांनी नमूद केले.अडलेल्या काही जागांवर सन्मानपूर्वक निर्णय लवकरच घेतला जाईल आणि उर्वरित जागांची घोषणा शांतपणे करण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शेवटी ठाकरे बंधूंवर निशाणा साधत त्यांनी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला की, “आज तुम्ही एकत्र येत आहात, पण वेगळे का झाला होता, याचे खरे कारण महाराष्ट्राला पुन्हा एकदा सांगा.”

हेही वाचा: Raj Thackeray Lucky Number: राज ठाकरेंचा ‘9’ फॉर्म्युला पुन्हा चर्चेत; ठाकरे बंधूंच्या युतीमागे अंकशास्त्रीय कनेक्शन?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number