Raj – Uddhav Thackeray: राजकारण तापणार जेव्हा ठाकरे बंधू मैदानात उतरणार! 5 तारखेपासून सभांचा धडाका, जाणून घ्या संपूर्ण माहिती

आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे 20 वर्षांनंतर एकत्र आले आहेत. 5 जानेवारीपासून संयुक्त सभांचा प्रचार सुरू होणार आहे.

Raj – Uddhav Thackeray: राजकारण तापणार जेव्हा ठाकरे बंधू मैदानात उतरणार! 5 तारखेपासून सभांचा धडाका, जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात दोन दशकांनंतर असा ऐतिहासिक क्षण आला आहे, ज्याची प्रतीक्षा प्रत्येक शिवसैनिक आणि मनसैनिकाला होती. आगामी 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन भावांनी अखेर खांद्याला खांदा लावून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून, बंडखोरांना शांत करण्यासाठी आजची रात्र दोन्ही पक्षांसाठी 'राजकीय रात्र' ठरणार आहे. मात्र, खऱ्या अर्थाने राजकीय वातावरण तापणार आहे ते 5 जानेवारीपासून, जेव्हा ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभांचा झंझावात सुरू होईल.

मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा एकदा 'ठाकरे' नावाचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी दोन्ही भावांनी कंबर कसली आहे. येत्या सोमवारपासून म्हणजेच 5 जानेवारीपासून या ऐतिहासिक सभांना सुरुवात होत आहे. मुंबईत पूर्व उपनगर, पश्चिम उपनगर आणि ऐतिहासिक शिवतीर्थावर (शिवाजी पार्क) या दोन्ही नेत्यांच्या भव्य तोफा धडाडणार आहेत. मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नाशिकमध्येही ठाकरे बंधूंचे संयुक्त दौरे निश्चित झाले आहेत.

हेही वाचा: Mumbai Expressway: मुंबईला मिळणार नवा द्रुतगती मार्ग; वाहतूक कोंडीवर मोठा तोडगा ठरणार बडोदा-मुंबई एक्सप्रेसवे

राजकीय रणनीती ठरवण्यासाठी उद्धव ठाकरे आज दुपारी राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी भेट देण्याची शक्यता आहे. या भेटीत दोन्ही पक्षांच्या संयुक्त वचननाम्यावर (Manifesto) अंतिम शिक्कामोर्तब होईल. हा वचननामा केवळ एक कागद नसून मुंबईच्या विकासाचा 'ठाकरे मॉडेल' असेल, असे बोलले जात आहे. दरम्यान, मनसेचे सर्व अधिकृत उमेदवार आज सकाळी अकरा वाजता राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले असून, त्यांना विजयाचा मंत्र दिला जात आहे.

केवळ वडीलच नव्हे, तर त्यांची मुले म्हणजे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्याही संयुक्त सभांचे आयोजन करण्यात आले आहे. युवाशक्तीला साद घालण्यासाठी ही नवी जोडी मैदानात उतरणार असल्याने तरुणांमध्ये प्रचंड उत्साह आहे. जिथे संयुक्त सभा शक्य नाहीत, तिथे दोन्ही नेत्यांच्या स्वतंत्र सभाही होतील, जेणेकरून कमी वेळात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचता येईल.

या निवडणुकीत सर्वात मोठे आकर्षण ठरणार आहे ते राज ठाकरे यांचा खास शैलीदार आवाज आणि उद्धव ठाकरे यांची मिश्किल पण बोचरी टीका. एका बाजूला भाजप आणि शिंदे गटाने कोटींच्या उधळणीचा आरोप राऊतांनी केला असताना, दुसऱ्या बाजूला ठाकरे बंधू 'मराठी अस्मिता' आणि 'ठाकरे ब्रँड' या मुद्द्यांवरून विरोधकांना घेरण्याची तयारी करत आहेत. परप्रांतीय मते आणि अमराठी महापौराच्या मुद्द्यावरून आधीच राजकारण तापले असल्याने, ठाकरेंची ही युती कोणाचे गणित बिघडवणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

उद्या संध्याकाळपर्यंत रिंगणात नेमके कोण उरते, याचे चित्र स्पष्ट होईल. मात्र, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची न राहता, ती संपूर्ण राज्याच्या अस्तित्वाची लढाई बनली आहे.

हेही वाचा: Sanjay Raut: "मुंबईत मराठी माणसाचं डोकं फोडण्याचा भाजपचा डाव" संजय राऊतांचा घणाघाती प्रहार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number